दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

स्पेक्ट्रमच्या 700 मेगाहर्ट्झ, 800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्ज, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ आणि 2500 मेगाहर्ट्झ बँडमध्ये लिलावासाठी अर्जदारांना आमंत्रित करण्याबाबत दूरसंचार विभागाची सूचना

Posted On: 06 JAN 2021 6:44PM by PIB Mumbai

 

दूरसंचार विभागाने आज 700 मेगाहर्ट्झ, 800 मेगाहर्ट्झ, 900 मेगाहर्ट्झ, 1800 मेगाहर्ट्ज, 2100 मेगाहर्ट्झ, 2300 मेगाहर्ट्झ आणि 2500 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम लिलाव करण्यासाठी अर्ज सादर करण्याची सूचना (एनआयए) केली आहे. एनआयएची मुख्य वैशिष्ट्ये अशीः

● लिलाव झालेल्या स्पेक्ट्रमची वैधता 20 वर्षे असेल.

● यशस्वी बोली लावणाऱ्यांसाठी हप्त्यांमध्ये पैसे भरण्याचा पर्याय आहे.

● लिलाव स्वरुप इ-लिलावाचे असून लिलावाच्या एकाच वेळी अनेक फेऱ्या होतील.

● एनआयएमध्ये राखीव किंमत, पूर्व-पात्रता अटी, बयाणा (ईएमडी), लिलाव नियम इत्यादींचा तपशील आहे.

● लिलावात भाग घेण्यासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 5-2-2021 आहे.

● लिलाव 01-03-2021 रोजी सुरू होणार असून तो ऑनलाईन घेण्यात येईल.

अर्ज सादर करण्याच्या विस्तृत माहितीसाठी येथे क्लिक करा.

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1686590) Visitor Counter : 273