अंतराळ विभाग

खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने इस्रो ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला चालना देईल- डॉ जितेंद्र सिंह

Posted On: 04 JAN 2021 9:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 जानेवारी 2021

इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था, खाजगी क्षेत्राच्या सहयोगाने ‘आत्मनिर्भर भारतअभियानाला चालना देईल असा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री  डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला आहे.

इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर निर्मितीच्या निर्णयामुळे खाजगी कंपन्या आणि स्टार्ट अप्स यांना समान संधी पुरवली जाईल असे ते म्हणाले. प्रस्तावित अंतराळ कार्यक्रमात लघु उपग्रह प्रक्षेपक यानभौगोलिक सेवा, एप्लिकेशन प्रोडक्ट इत्यादींचा समावेश आहे.

अंतराळ क्षेत्र, खाजगी सहभागासाठी खुले करण्याचा निर्णय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेले कल्पक पाऊल होते असे सांगून देशातल्या आघाडीच्या खाजगी  कंपन्यांनी  याचे मोठ्या प्रमाणात स्वागत केल्याचे ते म्हणाले.

अंतराळ क्षेत्राची क्षमता आणि संसाधने यामध्ये वृद्धी होण्याबरोबरच खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळे प्रतिभावंत अंतराळ संशोधकांचा  परदेशात जाण्याचा कल  मंदावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1686119) Visitor Counter : 241