वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
भारतातील उद्योगांची गुणवत्ता आणि उत्पादकता विकसित करण्यासाठी-फोकस्ड मँरेथाँन वेबिनार्सचे आयोजन होणार
Posted On:
03 JAN 2021 5:45PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचा, उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग, राष्ट्रीय गुणवत्ता परीषद (Quality Council of India, QCI) आणि राष्ट्रीय उत्पादकता परीषद (NationalProductivity C council, NCC) राष्ट्रीय मानके विभाग (BIS) आणि इंडियन चेंबर,भारतातील उद्योगांची गुणवत्ता आणि उत्पादकता विकसित करण्यासाठी 'उद्योग मंथन - विशिष्ट क्षेत्रासाठी विशिष्ट वेबिनार्सचे' आयोजन करत आहे. या वेबिनार्संना दिनांक 4 जानेवारी 2021 पासून प्रारंभ होत असून त्यांचा समारोप दिनांक 2 मार्च 2021 रोजी होईल. वाणिज्य आणि उद्योग मंत्री श्री. पियुष गोयल, दिनांक 6 जानेवारी 2021रोजी यात सहभागी होणाऱ्यांना संबोधित करतील.
प्रत्येक वेबिनारचे सत्र दोन तासांचे असेल, ज्यात विभागीय आणि उद्योगातील तज्ञांसोबतच्या चर्चेचा समावेश असेल आणि या सर्व सत्रांचे इच्छुकांसाठी यू ट्यूब द्वारे थेट प्रसारण केले जाईल.
या वेबिनारमधे केलेल्या शिफारशींचे संकलन करण्यात येईल ज्यायोगे उद्योग क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन भारतीय उत्पादने/सेवा यांची मागणी वाढेल जेणेकरून निर्यात वाढ आणि आर्थिक विकास याला चालना मिळेल.
श्री. पियुष गोयल यांनी नुकतेच भारतीय उद्योग आणि उत्पादकता सुधारण्यावर भर देण्यासाठी आणि त्याच्या विविध पैलूंवर विचार विनिमय करण्यासाठी सत्रे आयोजित करण्याचे आवाहन केले होते,जेणेकरुन देशाला उच्च दर्जाची कार्यक्षम उत्पादने ,व्यापारी आणि सेवापुरवठादार यांचा देश म्हणून मान्यता प्राप्त होईल.
****
M.Chopade/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685833)
Visitor Counter : 125