माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ख्यातनाम डॅनिश दिग्दर्शक थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनदर राऊंड’ चित्रपटाच्या भारतातील प्रीमियर शोने 51 व्या इफ्फिची गोव्यात होणार सुरुवात

Posted On: 02 JAN 2021 5:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021


51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फी येत्या 16 जानेवारी 2021 पासून गोव्यात सुरु होणार असून शुभारंभाचा चित्रपट म्हणून प्रख्यात डॅनिश दिग्दर्शक थॉमस विंटरबर्ग यांच्या ‘अनदर राऊंड’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. फ्रांन्समधील कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवलेल्या मॅड्स मिक्केलसनने  अभिनय केलेला हा चित्रपट यंदाच्या इफ्फीमधील मोठे आकर्षण ठरणार आहे. डेन्मार्ककडून हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारांच्या स्पर्धेसाठीही पाठवण्यात आला आहे.

WhatsApp Image 2021-01-01 at 5.18.18 PM.jpeg

महोत्सवाचे आणखी एक आकर्षण म्हणजे, संदीप कुमार यांच्या ‘मेहरुन्नीसा’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर शो देखील महोत्सवादरम्यान होणार आहे. फारुख जाफर या कसलेल्या अभिनेत्याची भूमिका असलेल्या या चित्रपटात, एका स्त्रीच्या स्वप्नांची कथा रेखाटण्यात आली आहे.

WhatsApp Image 2021-01-01 at 5.18.42 PM.jpeg

कियोशी कुरोसावा यांचा ऐतिहासिक मनोरंजक चित्रपट ‘वाईफ ऑफ अ स्पाय’ या चित्रपटाने महोत्सवाची सांगता 24 जानेवारीला 2021 ला होणार आहे. व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, या जपानी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा सिल्व्हर लायन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं.

WhatsApp Image 2021-01-01 at 5.13.08 PM.jpeg

51 व्या इफ्फीचे गोव्यात 16 ते 24 जानेवारी 2021 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा महोत्सव, अर्धा ऑनलाईन तर अर्धा प्रत्यक्ष स्वरूपात भरवला जात आहे. या महोत्सवात जगभरातील एकूण 224 चित्रपट दाखवले जाणार आहेत. यात ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात 21 नॉन-फिचर (माहिती-लघुपट) आणि 26 फिचर फिल्म (कथापट ) दाखवले जातील.

 

* * *

G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1685623) Visitor Counter : 155