कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
कर्तव्य बजावताना अपंगत्व आल्यास सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना “अपंगत्व भरपाई” मिळणार : डॉ जितेंद्र सिंग
Posted On:
01 JAN 2021 6:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2021
कर्मचाऱ्यांना सेवा बजावताना अपंगत्व आल्यास आणि तरीही सेवेत कायम ठेवले असल्यास त्याना “अपंगत्व भरपाई” देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती डॉ जितेंद्र सिंग यांनी आज दिली.
आजच्या आदेशाने युवा केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या विशेषत: सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ जवानांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण त्यांना बऱ्याचदा नोकरीच्या गरजेमुळे तसेच प्रतिकूल किंवा कठीण स्थितीमुळे कर्तव्ये पार पाडताना अपंगत्व येते.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, एखादा सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावताना त्याला अपंगत्व आले आणि अपंग असूनही सेवेत कायम राहिल्यास त्याला निहित दरानुसार एक रकमी भरपाई दिली जाईल.
S.Tupe/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685458)
Visitor Counter : 355