संरक्षण मंत्रालय
भारतीय वायूदलाने ई गव्हर्नन्स (ई-ऑफिस) पोर्टलचा केला प्रारंभ
Posted On:
31 DEC 2020 8:01PM by PIB Mumbai
भारतीय वायुदलाचे प्रमुख, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, व्हीएम, एडीसी, एअर चीफ मार्शल श्री. आर.के. एस. भदोरीया यांनी आज दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी वायुदलाचे मुख्यालय वायु भवन येथे वायूदलाच्या ई -गव्हर्नन्स (ई-ऑफिस) पोर्टलचा औपचारीक प्रारंभ केला. याची अंमलबजावणी डिजिटल इंडिया याचा एक भाग म्हणून करण्यात आली आहे आणि हा इ- -गव्हर्नन्स उपक्रम संपूर्ण भारतीय हवाई दलाचा कायापालट करत त्याचे कागदविरहीत कार्यालयात रुपांतर करेल.
भारतीय वायुदलात ई-गव्हर्नन्सची सुरुवात झाल्यामुळे सध्याच्या संपर्क पध्दतीत आमुलाग्र बदल होईल आणि फायलींग, दस्तावेजीकरण डिजिटल पध्दतीने होतील.त्यामुळे या व्यासपीठाची (विभागाची)पारदर्शकता वाढेल ,कार्यक्षमता सुधारेल, उत्तरदायित्वात वृध्दी होईल आणि माहितीची विश्वासार्हता सुनिश्चित होऊन कागदाचा वापर कमी होत ऐतिहासिक दस्तावेज सहज उपलब्ध होतील.
हा प्रकल्प एप्रिल 2020 रोजी सुरू झाला होता आणि तो 1 जानेवारी 2021 रोजी पूर्ण होणार होता. ही यंत्रणा सुरूवातीपासूनच संपूर्ण स्वदेशी बनावटीची असून भारतीय वायूदलाच्या फायलींग यंत्रणेला सानुकूलीत करणारी आहे. यामुळे फायली आणि कागदपत्रे तयार करणे, हाताळणे,पाठविणे, त्या कार्यान्वित करणे आणि संग्रह करणे शक्य होऊन त्याचा जलद गतीने निपटारा करत त्वरीत निर्णय घेणे शक्य होणार आहे.
***
G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1685177)
Visitor Counter : 194