भारतीय स्पर्धा आयोग

जमनालाल सन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून मुकंद सुमी स्पेशल स्टील मर्यादितच्या (“MSSSL/Target”)  51% भागभांडवलाच्या अधिग्रहणास भारतीय स्पर्धा आयोगाची मंजूरी

प्रविष्टि तिथि: 31 DEC 2020 1:16PM by PIB Mumbai

 

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) मुकंद सुमी स्पेशल स्टील मर्यादितच्या (MSSSL/Target)  51% भागभांडवलाचे जमनालाल सन्स प्रायव्हेट लिमिटेडकडून होणाऱ्या अधिग्रहणास स्पर्धा कायदा,2002 च्या  सेक्शन 31 (1) नुसार काल मंजूरी दिली आहे.

या प्रस्तावित एकीकरणामुळे  मुकंद सुमी स्पेशल स्टील मर्यादितच्या  51%  भागभांडवलावर  JSPLआणि त्यांच्या वारसाचा हक्क राहील. JSPL व मुकंद एकाच समूहाचा भाग आहेत.   कंपनी कायदा, 2013 मधील किमान भागभांडवलाच्या नियमाला अनुलक्षून JSPL ने अघिग्रहीत केलेल्या MSSSLच्या  नाममात्र शेअर संख्येवर (60 पेक्षा कमी) JSPL आणि काही निबंधकांचा संयुक्त ताबा राहील.

JSPL ही नोंदणी नसलेली आणि बजाज ग्रुप कंपनीच्या विविध शेअर्सवर ताबा असलेली मुख्य गुंतवणूकदार कंपनी आहे. JSPL ही फक्त गुंतवणूकदार व कर्ज देणारी कंपनी आहे आणि कोणतेही उत्पादन घेत नाही वा मालाचा पुरवठा करत नाही.

MSSSL ही खास प्रकारचे लोखंड संयुग हॉट रोल बार्स व हॉट रोल्ड वायर रॉड्स यांची निर्मिती, विपणवन, विक्री आणि वितरण यांच्या कक्षेतील व्यवसाय करते.

 

याबाबतीतील भारतीय स्पर्धा आयोगाचा सविस्तर आदेश जारी होईल.

****

U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1685025) आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu