पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान 28 डिसेंबर रोजी दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाईनवरुन भारताच्या पहिल्या चालकविरहित ट्रेनचे उद्घाटन करणार
पंतप्रधान विमानतळ एक्स्प्रेस मार्गावरील कार्यरत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेचे देखिल उद्घाटन करणार
Posted On:
26 DEC 2020 5:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता विमानतळ एक्स्प्रेस मार्गावरील पूर्णपणे कार्यरत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सेवेसह दिल्ली मेट्रोच्या मॅजेंटा लाइन (जनकपुरी वेस्ट-बोटॅनिकल गार्डन) वरील भारतातील पहिल्याच चालकविरहित ट्रेनचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन करणार आहेत.
या नवीन उपक्रमांमुळे प्रवासात आराम आणि गतीशीलतेच्या नवीन पर्वाची नांदी होईल. चालकविरहित ट्रेन्स पूर्णपणे स्वयंचलित केल्या जातील, ज्यामुळे मानवी चुकांची शक्यता कमी होईल. मॅजेंटा लाइनवर चालकविरहित सेवा सुरू झाल्यानंतर 2021 च्या मध्यापर्यंत दिल्ली मेट्रोच्या पिंक लाईनमध्ये चालकविरहित मेट्रो गाड्या सुरू होतील.
या सोबतच एअरपोर्ट एक्स्प्रेस लाइनवर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड पूर्णपणे कार्यान्वित केले जाणार आहे. देशातील कोणत्याही भागातून जारी केलेले रुपे-डेबिट कार्ड असलेल्या व्यक्तिला ते कार्ड वापरुन विमानतळ एक्सप्रेस मार्गावर प्रवास करता येईल. ही सुविधा 2022 पर्यंत संपूर्ण दिल्ली मेट्रो नेटवर्कवर उपलब्ध होईल.
* * *
G.Chippalkatti/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683812)
Visitor Counter : 181
Read this release in:
Punjabi
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam