गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
हॉलिडे होम्सचे बुकींग, 5 अशोका रोड सारख्या सामाजिक सोहोळ्यासाठीच्या जागा, एक लाखाहून जास्त सरकारी निवासस्थानांचे वाटप यासाठी एक सर्वसमावेशक नवीन मंच
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 25 डिसेंबरला सुप्रशासन दिन साजरा करण्यात येतो
Posted On:
25 DEC 2020 6:29PM by PIB Mumbai
नागरिकांना जीवन सुलभीकरणासोबतच पारदर्शकता आणि जबाबदारी निभावण्याला प्रोत्साहन मिळावे या हेतूने, स्थावर निदेशनालय, गृह व शहरी व्यवहार मंत्रालयाने आज नवे वेब पोर्टल व ई-संपदा हे मोबाईल अॅप देशाला अर्पण केले. या नवीन अप्लीकेशनमुळे या सर्व सेवांसाठी तसेच एक लाखांहून अधिक सरकारी निवासी जागांचे वाटप, सरकारी उपक्रमांना ऑफिस स्पेस उपलब्ध करून देणे या सर्व सेवांसाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध होईल.
एक राष्ट्र, एक व्यवस्था यासाठी, यापूर्वी स्थावर निदेशालनालयाची चार संकेतस्थळे (gpra.nic.in, eawas.nic.in, estates.gov.in, holidayhomes.nic.in) व दोन मोबाईल एप (m-Awas & m-Ashoka5) ही एकातच विलीन केली गेली आहेत
दूरदृश्य प्रणाली माध्यमाच्या व्यासपीठावरून आयोजित केलेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, स्थावर वाटप, त्याचा ताबा घेणे, इतर नियमितता, विना थकबाकी प्रमाणपत्र वितरण या सर्व स्थावर मालमत्ता संबधित कामांमध्ये पारदर्शकता आणणे आणि जबाबदारी निश्चित करणे व त्यायोगे ई-गवर्नंन्सला चालना मिळावी या हेतूने हे एक महत्वाचे पाउल आहे.
हे युजर फ्रेंडली व डिवाईस रिस्पॉन्सिव आहे. वापरकर्त्यांना सेवांचा दृश्य अनुभव मिळेल आणि नंतर ऑनलाईन फीडबॅकही देता येईल.
हे पोर्टल देशभरातील वापरकर्त्यांना तक्रार नोंदवणे, कागदपत्रे सादर करणे, आणि आभासी सुनावणीला उपस्थिती लावणे यासारख्या बाबी सोप्या होतील. E-Sampada हे भारतभरात सर्व प्रकारच्या सेवा ऑनलाईन, पेपरलेस, कॅशलेस प्रकारात उपलब्ध करून देईल
हे वेब-पोर्टल www.esampada.mohua.gov.in येथे पाहता येईल.
***
G.Chippalkatti/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683651)
Visitor Counter : 239