सांस्कृतिक मंत्रालय
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय गृह मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
प्रविष्टि तिथि:
21 DEC 2020 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 डिसेंबर 2020
नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 23 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या आणि एक वर्षभर चालणारे कार्यक्रम ही उच्च स्तरीय समिती निश्चित करेल. केंद्रीय गृह मंत्री अमित शहा या उच्च स्तरीय समितीच्या अध्यक्षस्थानी राहतील.
नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांना आदरांजली वाहताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘23 जानेवारी 1897 ला जानकीनाथ बोस यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला. थोर स्वातंत्रसेनानी आणि विचारवंत झालेल्या या पुत्राने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले आयुष्य वेचले’. हा स्मरणोत्सव म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे शौर्य आणि वसाहतवाद्याना प्रतिकार करण्यासाठीच्या त्यांच्या अनमोल योगदानाला आदरांजली आहे.
या उच्च स्तरीय समितीत तज्ञ, इतिहास तज्ञ, लेखक, नेताजींचे कुटुंबीय,आझाद हिंद सेनेशी संबंधित मान्यवर यांचा समावेश आहे. दिल्ली, कोलकाता सह, नेताजी आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित भारतातल्या आणि विदेशातल्या स्थळी कार्यक्रमाबाबत समिती मार्गदर्शन करेल.
2019 मध्ये अंदमान भेटीदरम्यान पंतप्रधानांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या हंगामी सरकारला आदरांजली अर्पण केली. रॉस, नील आणि हवलॉक बेटांची नावे बदलून त्यांचे अनुक्रमे नेताजी सुभाष चंद्र बोस द्वीप, शहीद द्वीप आणि स्वराज द्वीप असे नामकरण केले.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1682487)
आगंतुक पटल : 337