विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सर्वसामान्यांमध्ये शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी आयआयएसएफ 2020 च्या पार्श्वभूमीवर विविध संस्थाकडून विज्ञान यात्रांचे आयोजन


देशभरातील सुमारे 30 ठिकाणांवर या विज्ञान यात्रांचे आयोजन करण्यात येणार

Posted On: 14 DEC 2020 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2020

 

IISF 2020 - Science for Self-Reliant India and Global Welfare
विज्ञान यात्रा आयआयएसएफ अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाच्या प्रसिद्धीचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत फिरत्या विज्ञान प्रदर्शन व्हॅन्सना देशभरातील विविध शहरांतून रवाना करण्यात येणार आहे आणि सर्वसामान्य जनतेमध्ये शास्त्रीय दृष्टीकोन निर्माण करणे आणि विज्ञानाशी संबंधित संस्कृती रुजवणे हा या विज्ञान प्रवासाच्या आयोजनाचा उद्देश आहे.

सीएसआयआर- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, गोवा या संस्थेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात या संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांनी स्वागताचे भाषण केले. हा विज्ञान महोत्सव समाजाच्या प्रत्येक स्तरावर आपला प्रभाव निर्माण करेल आणि प्रत्येक स्तरासाठी लाभदायक ठरेल, असे  सीएसआयआरचे संचालक आणि डीएसआयआरचे सचिव डॉ. शेखर सी मांदे यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. आयआयएसएफ 2020 चे महत्त्व आणि त्याच्या प्रमुख वैशिष्ट्यांबाबत माननीय अतिथी म्हणून उपस्थित असलेले विज्ञान भारती (विभा)चे राष्ट्रीय आयोजक सचिव जयंत सहस्रबुद्धे यांनी विभा अँड आयआयएसएफ या त्यांच्या व्याख्यानाच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. 

नवी दिल्ली येथील केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. एस. पी गौतम या कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी “जीवनाचा स्रोत आणि उत्क्रांती” या विषयावर आपला दृष्टीकोन मांडला. गोव्याच्या विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रो. सुहास गोडसे यांनी आभार प्रदर्शन केले.

सध्याच्या कोविड-19 महामारीच्या काळात सहाव्या आयआयएसएफचे आयोजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील 30 ठिकाणांची निवड करण्यात आली असून या ठिकाणी या विज्ञान यात्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.

* * *

M.Chopade/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1680562) Visitor Counter : 162