रेल्वे मंत्रालय
विभागीय रेल्वेला अनारक्षित तिकिटे देण्याची दिलेली परवानगी केवळ उपनगरी आणि काही मर्यादित भागांतील लोकल पॅसेंजर गाड्यांसाठी आहे
सणासुदीच्या विशेष गाड्या आणि क्लोन विशेष गाड्या या गाड्यांसह कोणत्याही एक्स्प्रेस गाड्या पूर्णत: आरक्षित म्हणून चालवल्या जातील, या धोरणामध्ये बदल केलेला नाही
पुढील बदल, जेंव्हा करण्यात येतील तेंव्हा संबंधितांना कळविण्यात येतील
Posted On:
13 DEC 2020 6:33PM by PIB Mumbai
अनारक्षित तिकीटे देण्यासंदर्भात काही माध्यमांतून माहिती प्रसारीत झाली आहे. त्यासंदर्भातील मार्गदर्शनासाठी ही माहिती देण्यात येत आहे-
सणासुदीच्या विशेष गाड्या आणि क्लोन विशेष गाड्या या गाड्यांसह कोणत्याही एक्स्प्रेस गाड्या पूर्णत: आरक्षित म्हणून चालवल्या जातील, या धोरणामध्ये कोणताही बदल आतापर्यंत केलेला नाही.
त्यानुसार आतापर्यंत सध्याच्या मेल एक्स्प्रेस विशेष गाड्या ज्यात, सणासुदीच्या /सुटी विशेष गाड्या आणि क्लोन विशेष गाड्या यांचा पूर्णतः आरक्षित म्हणून समावेश आहे, त्यांच्या दुसऱ्या वर्गाच्या डब्यांच्या आरक्षित तिकिटांसह आणि एसएलआरच्या प्रवासी भागासह त्या पूर्णतः आरक्षित म्हणून चालविल्या जातील. विभागीय रेल्वेला काही अल्प भागात कार्यरत असलेल्या गाड्यांसाठी अनारक्षित तिकिटे देण्याची दिलेली परवानगी ही केवळ उपनगरी आणि काही मर्यादित भागांतील लोकल पॅसेंजर गाड्यांसाठी आहे.
कोविड कालावधीत रेल्वे चालविणे, प्रवासाचे नियम, आणि आरक्षण यांच्या नियमांत सातत्याने बदल होत आहेत.
पुढील बदल, जसे आणि जेंव्हा घडतील, त्यानुसार त्यासंदर्भात सर्व संबंधितांना कळविले जाईल.
***
S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1680414)
Visitor Counter : 179