दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
बीएसएनएल, स्कायलोसह भागीदारीतून भारतात जगातील पहिले उपग्रह-आधारित नॅरोबँड -आयओटी नेटवर्क सुरु करणार
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2020 7:40PM by PIB Mumbai
बीएसएनएलने स्कायलोटेक इंडियाबरोबरच्या भागीदारीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पाला अनुसरुन उपग्रह-आधारित नॅरोबँड -आयओटी नेटवर्कमध्ये महत्वपूर्ण घडामोडीची घोषणा केली असून मच्छीमार, शेतकरी, बांधकाम, खाणकाम आणि लॉजिस्टिक उद्योगांबरोबर याची सुरुवात होणार आहे. यामुळे आता अद्याप न जोडलेली लाखो यंत्रे, सेन्सर आणि औद्योगिक आयओटी उपकरणांसाठी कनेक्टिव्हिटीच्या सर्वव्यापी तंत्रात भारताला प्रवेश मिळणार आहे.
स्कायलोद्वारा स्वदेशी विकसित हे नवीन ‘मेड इन इंडिया’ तंत्र बीएसएनएलच्या उपग्रह-जमीन पायाभूत सुविधांशी जोडले जाईल आणि भारतीय समुद्रांसह संपूर्ण देशभरात त्याची व्याप्ती असेल. ही व्याप्ती इतकी विस्तृत असेल की काश्मीर आणि लडाख ते कन्याकुमारी आणि गुजरात ते ईशान्य अशा भारतीय सीमेपर्यंत कुणीही यापासून वंचित राहणार नाही.
बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी.के. परवार म्हणाले, “ग्राहकांना परवडणारी आणि नाविन्यपूर्ण दूरसंचार सेवा आणि उत्पादने उपलब्ध करुन देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या बीएसएनएलच्या कल्पनेतून हा उपाय साकारण्यात आला आहे.” स्कायलो 2021 मध्ये कोविड-19 लसीचे प्रभावी वितरण सक्षम करण्यासाठी लॉजिस्टिक क्षेत्राला महत्वपूर्ण माहिती उपलब्ध करण्यात मदत करेल जे देशाच्या सेवेत मोठे योगदान असेल, असे ते म्हणाले.
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1679774)
आगंतुक पटल : 319