भारतीय स्पर्धा आयोग
प्रेस्टीज ग्रुपची विशिष्ट मालमत्ता अधिग्रहीत करण्यास ब्लॅकस्टोन ग्रुपच्या सहयोगी कंपन्यांना भारतीय स्पर्धा आयोगाची मंजूरी
Posted On:
08 DEC 2020 11:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 8 डिसेंबर 2020
भारतीय स्पर्धा आयोगाने प्रेस्टीज ग्रुपची विशिष्ट मालमत्ता अधिग्रहीत करण्यास ब्लॅकस्टोन ग्रुप इंक. या कंपनीसमूहाच्या सहयोगी कंपन्यांना मंजूरी दिली आहे.
गुंतवणूक धोरण आणि तत्संबधीत उपक्रम हे या अधिग्रहीत कंपनी म्हणजेच ब्लॅकस्टोन ग्रुप इंक. कंपनीसमूहाशी सहयोगी कंपनीचे मुख्य उपक्रम आहेत. परंतू, सध्या त्यांच्या भारतात वा जगभरात कोठेही, कोणत्याही व्यवसाय प्रक्रिया सुरू नाहीत. अधिग्रहण करणाऱ्या कंपन्या या ब्लॅकस्टोन ग्रुप इंक. या कंपनीसमूहाकडून व्यवस्थापन होणाऱ्या आहेत.
लक्ष्य कंपन्या भारतातील रिअल इस्टेट विकास व्यवसायात आहेत. त्यांच्याकडे भारतातील विविध शहरांमधील निवासी, वाणिज्य तसेच आदरातिथ्य यासारख्या प्रमुख क्षेत्रातील रिअल इस्टेटींच्या विकास योजनांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहे.
या बाबतीत भारतीय स्पर्धा आयोगाचा सविस्तर आदेश लवकरच जारी होईल.
* * *
M.Chopade/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1679292)
Visitor Counter : 103