युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

क्रीडा जगतातील एकात्मता जोपासण्यासाठी उत्तेजक द्रव्य विरोधी जागतिक संस्थेला भारताचे संपूर्ण सहकार्य – किरेन रिजीजू


Posted On: 07 DEC 2020 7:23PM by PIB Mumbai

 

उत्तेजक द्रव्य विरोधी आणि क्रीडा विज्ञान या विषयावरच्या एका वेबिनारचे केंद्रीय  युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी उद्घाटन केले. राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी एजन्सी (नाडा), राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आणि राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळा यांनी संयुक्तपणे या वेबिनारचे आयोजन केले होते.

खिलाडू वृत्ती कायम राखत क्रीडा जगत स्वच्छ राहावे यासाठीच्या सर्व प्रयत्नात उत्तेजक द्रव्य विरोधी जागतिक संस्थेला (वाडा) भारत सहकार्य करेल असे आश्वासन रिजीजू यांनी दिले.  वाडा प्रती भारताचे योगदान उत्तेजक द्रव्यविरोधी संशोधनासाठी आणि उत्तेजक द्रव्यविरोधी विषयक तपास क्षमता मजबूत करण्यासाठी उपयोगात आणले जाईल हे ऐकून आनंद झाल्याचे ते म्हणाले.

उत्तेजक द्रव्यविरोधात वाडा या जागतिक संस्थेच्या सर्व नियमांची अंमलबजावणी  नाडा ही राष्ट्रीय संस्था करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उत्तेजक द्रव्य विरोधातल्या सर्व प्रयत्नासाठी राष्ट्रीय संस्था कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. वाडाने सुचवलेल्या विविध मुद्यांबाबत राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य चाचणी प्रयोगशाळेने सुधारणात्मक उपाय केले असून वाडाच्या मार्गदर्शक तत्वानुसार लवकरच उत्तेजक द्रव्य विश्लेषण करण्यासाठी पुन्हा सुरु करण्याची परवानगी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

दूरदृश्य प्रणाली द्वारे झालेल्या या बैठकीला वाडाचे अध्यक्ष विटोल्ड बांका, नाडाचे सदिच्छा दूत सुनील शेट्टी उपस्थित होते.

***

S.Thakur/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678903) Visitor Counter : 111