उपराष्ट्रपती कार्यालय

उपराष्ट्रपतींच्या हस्ते दिवंगत पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या सन्मानार्थ स्मृती टपाल तिकिटाचे विमोचन

Posted On: 04 DEC 2020 4:36PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 04 डिसेंबर 2020

 

उपराष्ट्रपती एम वेंकैय्या नायडू यांनी आज दिवंगत पंतप्रधान आय. के. गुजराल यांच्या सन्मानार्थ स्मृती टपाल तिकिटाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे विमोचन करताना त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपराष्ट्रपती म्हणाले की, गुजराल हे विद्वान, मृदुभाषी आणि एक "सज्जन-राजकारणी" होते.  त्यांनी आव्हानांचा किंवा अडचणींचा सामना करताना कधीही आपल्या मूल्यांच्या बाबतीत तडजोड केली नाही. प्रेमळ स्वभाव असलेल्या गुजराल यांनी राजकीय क्षेत्रात अनेकांशी मैत्री केली" असेही ते पुढे म्हणाले.

माजी पंतप्रधानांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून वर्णन करताना त्यांनी आठवण सांगितली की गुजराल यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत आणि कविता वाचन आणि पठणाचा ते आनंद घेत असत. देशाचे परराष्ट्रमंत्री असतानाच्या कार्यकाळात त्यांनी जाहीर केलेले गुजराल सिद्धांतहे धोरण कायम स्मरणात राहील असेही ते म्हणाले.

सर्व राजकीय नेत्यांना विरोधी नेत्यांकडे शत्रू म्हणून नाही तर प्रतिस्पर्धी म्हणून पाहण्याचे आवाहन करताना उपराष्ट्रपतींनी चांगले सामाजिक संबंध राखण्याची इच्छा व्यक्त केली.  सर्व पक्षांना राष्ट्र प्रथमया धोरणाचा अवलंब करण्याचे सांगताना त्यांनी मतभेद बाजूला सारून राष्ट्रहितासाठी परराष्ट्र धोरणाला पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली.

दक्षिण आशियामध्ये जगातील जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्या राहत असल्याकडे लक्ष वेधत नायडू यांनी दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व देश एकत्र आल्यास सार्क प्रादेशिक गटातील सर्व देशांमध्येच समृद्धी आणि कल्याणाला चालना मिळू शकेल, असे ते म्हणाले. 

जर समूळ उच्चाटन केले नाही तर दक्षिण अशियामधील सर्व लोकांचे संपन्न व भरभराटीचे भविष्य घडवण्याचे सर्व प्रयत्न  दहशतवादाचा धोका निष्फळ ठरवेल  असा इशारा उपराष्ट्रपतींनी दिला.

यावेळी उपराष्ट्रपतींनी नेतृत्व भूमिकेत महिलांच्या अधिकाधिक सहभागाच्या गरजेवर भर दिला आणि मद्रास उच्च न्यायालयात महिला न्यायाधीशांची संख्या 13 वर पोहोचली तर चार महिलांचा खंडपीठावर समावेश झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

या कौतुकास्पद उपक्रमासाठी मद्रास उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि तामिळनाडू आणि केंद्र सरकार यांचे कौतुक करतांना त्यांनी हे इतरांसाठी  अनुकरणीय असल्याचे सांगितले. उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयांमधील महिला न्यायाधीशांची संख्या कमी असल्याकडे लक्ष वेधून नायडू यांनी उच्च न्यायालयात महिलांचे प्रतिनिधित्व कमी असल्याबद्दल चिंता व्यक्त केली.

नायडू यांनी जनतेला मास्क वापरणे, वारंवार हात धुणे आणि  सुरक्षित अंतर राखण्याच्या कोविडविषयक सूचनांचे पालन करत सर्व खबरदारी घेत राहण्याचे आवाहन केले.

इंद्रकुमार गुजराल यांच्यासारख्या महान नेत्यांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या योगदानाविषयी आजच्या पिढीला जागरूक केले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

***

S.Thakur/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1678309) Visitor Counter : 166