गृह मंत्रालय

अमेरिका -भारत अंमलीपदार्थ विरोधी कृतीगटाच्या उद्‌घाटन बैठकीत उभय देशांच्या अधिकाऱ्यांचा व्हर्च्युअल सहभाग


अंमलीपदार्थ विरोधी नियमन आणि कायदा अंमलबजावणीवरील सहकार्य वाढवण्यावर बैठकीत व्यापक चर्चा

दक्षिण आशियातील अंमलीपदार्थ विरोधी उपक्रमांसाठी क्षमता निर्मितीत भारताने प्रादेशिक नेतृत्व म्हणून भूमिका बळकट करण्याच्या मुद्यावर उभय पक्षी चर्चा

अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांवरील उपचार आणि अमली पदार्थाचा गैरवापर याविषयीची जनजागृती या माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यात सहमती

Posted On: 02 DEC 2020 9:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  2 डिसेंबर 2020

अमेरिका -भारत अंमलीपदार्थ विरोधी कृतीगटाच्या उद्‌घाटन बैठकीसाठी   24 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिका आणि भारत या उभय देशांच्या अधिकाऱ्यांनी व्हर्च्युअल सहभाग नोंदवला. भारतीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व अमलीपदार्थ नियंत्रण मंडळाचे उप-महासंचालक सचिन जैन यांनी केले तर राष्ट्रीय औषध नियंत्रण धोरणाचे व्हाईट हाऊस कार्यालयाचे सहाय्यक संचालक कॅम्प चेस्टर, आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ व कायदा अंमलबजावणी उप-सहाय्यक सचिव जॉर्गन अँड्र्यूज, अमेरिकेच्या उप सहाय्यक ऍटर्नी जनरल जेनिफर हॉज, यांनी  संयुक्तपणे अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. संबंधित प्रतिनिधींनी अंमलीपदार्थ विरोधी नियमन आणि कायदा अंमलबजावणीवरील सहकार्य वाढवण्यावर व्यापक चर्चा केली.  दोन्ही देशांनी संयुक्त कृतीसाठी क्षेत्रे निश्चित केली आणि या महत्त्वपूर्ण विषयावर  समन्वय सुरू ठेवण्याचा संकल्प केला.

भारत आणि अमेरिकेला भेडसावणाऱ्या अंमली  पदार्थांशी  संबंधित आव्हानांच्या विस्तृत मुद्यांवर यावेळी चर्चा झाली . बेकायदेशीर उत्पादन, निर्मिती, तस्करी, आणि फार्मास्युटिकल व अवैध  औषधांचे वितरण तसेच त्यांचे उत्पादन करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रसायनांवर अंकुश ठेवण्यासाठी सहकार्य बळकट करण्याप्रति  उभय देशांनी  वचनबद्धता व्यक्त केली.  सहभागी नेत्यांनी  त्यांच्या संबंधित देशाच्या कायदे आणि नियमांनुसार अंमली पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. दक्षिण आशियातील अंमलीपदार्थ विरोधी उपक्रमांसाठी क्षमता निर्मितीत भारताची प्रादेशिक नेतृत्व भूमिका बळकट करण्याच्या मुद्यावर उभय पक्षी   चर्चा  चर्चा झाली.

भारत आणि अमेरिकेने अमलीपदार्थ आणि रसायनांचे उत्पादन, वितरण आणि निर्यात/आयात रोखण्यासाठी या माहितीची  देवाणघेवाण  करण्याबाबत सहमती दर्शविली. 2021 च्या वसंत ऋतूत  सीएनडब्ल्यूजीच्या बैठकीत ही  चर्चा पुढे सुरू ठेवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शविली

 

Jaydevi P.S/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1677822) Visitor Counter : 198