रेल्वे मंत्रालय

रेल्वे मालवाहतूकीत 2020 मधे भरीव वाढ, गतवर्षीच्या नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा  याच काळात 9% वाढ


भारतीय रेल्वेच्या मालवाहतूक लाभाच्या  आकडेवारीची  गती कायम, आणि नोव्हेंबर महिन्यातील मालवाहतूकीतही वाढ

Posted On: 01 DEC 2020 4:01PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेने ,रेल्वेच्या मालवाहतूक लाभाच्या आकडेवारीची  गती कायम ठेवली असून नोव्हेंबर 2020 या महिन्यातील मालवाहतूकही वाढली आहे.

भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीत नोव्हेंबर 2020 या कालावधीत  गतवर्षीच्या तुलनेत मालवाहतुकीत तसेच त्यावरील कमाईत वाढ झाली आहे.

नोव्हेंबर 2020 मधे भारतीय रेल्वेद्वारे 109.68 दशलक्ष मेट्रिक टन माल चढविला गेला, जो गतवर्षीच्या तुलनेत याच काळा पेक्षा 9% (100.96 दशलक्ष मेट्रिक टन) अधिक आहे. या काळात भारतीय रेल्वेने मालवाहतूकीतून 10657.66 कोटी रुपये इतकी कमाई केली, जी गतवर्षी याच काळात झालेल्या (10207.87कोटी रुपये) कमाईपेक्षा 449.79 (4%)कोटी रुपये अधिक आहे.

नोव्हेंबर 2020 या महिन्यात 109.68 दशलक्ष मेट्रिक टन माल चढविला गेला, ज्यात 48.48 दशलक्ष मेट्रिक टन कोळसा, 13.77 दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिज, 5.1 दशलक्ष मेट्रिक टन अन्नधान्य, 5.41 दशलक्ष मेट्रिक टन खते  आणि 6.62 दशलक्ष मेट्रिक टन सीमेंट( क्लींकर व्यतिरिक्त) यांचा समावेश आहे.

या कालावधीत नोव्हेंबर 2020 मधे दररोज सरासरी 58,726 वॅगन्स चढविण्यात आल्या, त्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत (56,128) 4.6%अधिक आहेत.

सणासुदीच्या काळातील सुट्या, निवार चक्रीवादळाचा मालवाहतूकीवर परिणाम होऊन सुद्धा भारतीय रेल्वेने गेल्या तीन महिन्यात (ऑक्टोबर 15%,सप्टेंबर 15% ) उत्साहवर्धक  आकडेवारी नोंदवत आपली आर्थिक सुधारणा स्थिर होत असल्याचे दर्शविले आहे.

रेल्वे मालवाहतूकीकडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सवलती/सूट दिल्या गेल्या होत्या, याचा उल्लेख करायलाच हवा.

हे लक्षात घ्यायला हवे, की मालवाहतूकीवर संस्थागत आणि  आगामी शून्यावर आधारीत वेळापत्रकानुसार कार्यवाही केली जाईल.

कोविड-19 चा वापर देखील  रेल्वेने आपली सर्वांगीण कार्यक्षमता  आणि कामगिरी  सुधारण्यासाठी केला आहे

 

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1677461) Visitor Counter : 201