नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप ही आपली बेटे हरित उर्जा करण्याचे भारताचे उद्दिष्ट : आर के सिंह
नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना चालना देण्यासाठी मालदीवच्या प्रयत्नांमध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचे आश्वासन
Posted On:
28 NOV 2020 10:26PM by PIB Mumbai
केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा आणि उर्जामंत्री आर. के. सिंह यांनी आज नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नात मालदीव देशाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तिसर्या जागतिक री -इनव्हेस्ट परिषदेतील मालदीव देश सत्रात बोलताना सिंह म्हणाले की, भारताने देखील आपली सर्व बेट पूर्णपणे हरित ऊर्जा बेटे करण्यास प्राधान्य दिले आहे. ऊर्जामंत्री पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या बेटांना (अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप) पूर्णतः हरित करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, म्हणजेच या बेटांच्या सर्व उर्जा गरजा अक्षय ऊर्जेतून पूर्ण केल्या जातील.

भारताकडे महत्वपूर्ण ऊर्जा कार्यक्षमता कार्यक्रम आहे ज्या अंतर्गत 11 दशलक्षाहून अधिक एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत अशी माहिती ऊर्जामंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की कार्बन उत्सर्जन कमी करुन हरित उर्जेच्या अधिकाधिक स्रोतांमध्ये प्राधान्यक्रमाने वाढ केली जाईल. ते म्हणाले की, मालदीव ने एक सुंदर देश म्हणून तसेच आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून आपले सौंदर्य टिकवून ठेवणे आणि वाढवणे आवश्यक आहे. म्हणूनच मालदीवमध्ये नवीकरणीय उर्जेचा वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे असे ते म्हणाले.
नवीकरणीय ऊर्जा ही केवळ ज्या राज्यांमध्ये बेटे आहेत त्यांच्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठीदेखील आवश्यक आहे यावर त्यांनी भर दिला. बेटे असलेली राज्य/प्रदेशांना ग्लोबल वार्मिंगचा अधिक धोका अधिक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
या कार्यक्रमात बोलताना मालदीव सरकारचे मंत्री हुसेन रशीद हसन (एमई) यांनी तेलाच्या आयातीवरील अवलंबन कमी करण्याच्या गरजेवर भर दिला. तिकूल हवामानातील बदलांच्या दृष्टीने मोठ्या धोक्याचा सामना करणाऱ्या त्यांच्या देशासाठी त्यांनी नवीकरणीय ऊर्जेचे महत्त्व ओळखले आहे. नवीकरणीय उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूकदारांसाठी घेतलेल्या अनुकूल उपाय / धोरणांचे तपशीलवार माहिती त्यांनी दिली.

2013 पासून मालदीव सरकार पर्यावरणीय तसेच अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या नवीकरणीय ऊर्जेच्या उद्दीष्टांसाठी कृतीशीलपणे प्रयत्न करीत आहे. मालदीव ऊर्जा धोरण आणि रणनीती 2016 ("2016 ऊर्जा धोरण") सह सुरुवात करून देशातील नवीकरणीय उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खाजगी क्षेत्राच्या नऊ प्रमुख धोरणांपैकी एक म्हणून नवीकरणीय उर्जा विकासास प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करीत आहे.
Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676890)