वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताचे दरवाजे अधिक खुले करणे आहे : त्यामुळे  भारत जगासोबत सामर्थ्य, समानता, न्याय्य आणि परस्पर अटींवर कार्य करेल : पियुष गोयल


भारताची बलस्थाने असणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच  उच्च तंत्रज्ञानयुक्त उत्पादने उपलब्ध करुन देणार्‍या देशांसमवेत एफटीए अर्थात मुक्त व्यापार करार करण्यासाठी भारताने आपली ऊर्जा केंद्रित केली पाहिजे

Posted On: 28 NOV 2020 9:30PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य, रेल्वे आणि ग्राहक व्यवहार व अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल म्हणाले की,आत्मनिर्भर भारत म्हणजे भारताचे दरवाजे अधिक खुले करणे आहे त्यामुळे  भारत जगासोबत सामर्थ्य, समानता, न्याय्य आणि परस्पर अटींवर कार्य करेल. स्वराज्य माग कार्यक्रमात आत्मनिर्भर भारताचा दृष्टीकोन आणि तत्वज्ञानयाविषयी गोयल म्हणाले की, जेव्हा आपण आत्मनिर्भर भारत या विषयी बोलतो, आपण देशामध्ये जे काही करू शकतो ते तयार करण्यासाठी, जगभरातील अनुभवांमधून शिकण्यासाठी, उत्तम तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी, भांडवल, कौशल्य आणि उच्च-गुणवत्तेचे शिक्षण आणि आरोग्यसेवा आकर्षित करण्यासाठी भारताने आपल्या उर्जेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आत्मनिर्भर साध्य करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि तंत्रज्ञान व्यवस्थेचा विस्तार करण्यासाठी सरकार स्टार्ट अप्स आणि उद्योगाला मदत करेल, असेही ते म्हणाले.

गोयल म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वोकल फॉर लोकलच्या आवाहनाचे पालन केले तरच आत्मनिर्भर भारतचे स्वप्न साकार होऊ शकते. जन-भागीदारी (जनतेचा सहभाग) द्वारेच आत्मनिर्भर भारत शक्य आहे, असे सांगताना ते म्हणाले की आत्मानिर्भर भारत वास्तवात येण्यासाठी प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता आहे. सर्वांनी स्वावलंबी भारत, आर्थिक महासत्ता होण्याच्या प्रवासाचा भाग होण्याचे निमंत्रण देत मंत्री म्हणाले, “जर आपण दृढनिश्चय, उत्साह आणि गती घेऊन पुढे मार्गक्रमण केले तर मला खात्री आहे  की आपण आपले आत्मनिर्भर भारत लक्ष्य गाठण्यात नक्कीच यशस्वी होऊ. .

गोयल म्हणाले की  ज्या देशांसोबत आपली पारदर्शक व्यापार यंत्रणा आहे अशा पारंपारिक व्यापार यंत्रणेत काम करत असलेल्या देशांसोबत आपण मुक्त व्यापार कराराचा (एफटीए) फायदा घेतला पाहिजे. ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात भारतीय बाजारपेठांमध्ये आपले लक्ष केंद्रित करत असलेल्या  विकसित देशांशी एफटीए करण्यासाठी भारताने आपली ऊर्जा केंद्रित केली पाहिजे. तसेच भारताची बलस्थाने असणाऱ्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देतानाच  उच्च तंत्रज्ञानाची उत्पादने उपलब्ध करुन देणार्‍या देशांसमवेत एफटीए करण्यासाठी भारताने आपली ऊर्जा केंद्रित केली पाहिजे

गोयल म्हणाले की वस्तुनिर्माण व उत्पादन क्षेत्रात आपण उच्च प्रतीचे व उत्पादनक्षमतेचे स्तर शोधत आहोत. दर्जा आणि उत्पादनशक्ती ही भारताच्या भविष्यातील वस्तुनिर्माण उद्योगाची वैशिष्ट्य असतील, असे सांगून ते म्हणाले की प्रत्येक महिन्यात प्रत्येक क्षेत्र त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यास प्रोत्साहन देण्यासाठी एक दिवस समर्पित करेल. शेतकऱ्यांविषयी बोलताना ते म्हणाले की आम्ही आता देश व आपले शेतकरी यांना सामर्थ्यवान करण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन देशात कोठेही विकण्यासाठी  त्यांना सज्ज करत आहोत. आमच्या शेतक्यांनी आम्हाला अन्नधान्यात स्वयंपूर्ण केले आहे. आम्ही आता शेतकऱ्यांचे हात  बळकट करण्याच्या प्रयत्नात आहोतअसे ते म्हणाले.

भारतीय रेल्वेबद्दल गोयल म्हणाले की रेल्वे  आता विकासाचा  पुढचा  स्तर गाठण्यासाठी सज्ज आहे  आम्ही रेल्वेला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींसाठी अधिकाधिक भारतीय पुरवठादारांचा शोध घेत आहोत.

 

Jaydevi PS/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676872) Visitor Counter : 194