अर्थ मंत्रालय

CBDT ने कर लेखापरिक्षण अहवाल अपलोड करताना ICAI पोर्टलवरून मिळवलेला UDIN केला सक्तीचा

Posted On: 26 NOV 2020 9:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  26 नोव्हेंबर 2020

भारतीय सनदी लेखापाल संस्थेने ICAI त्यांच्या राजपत्रातील  2 ऑगस्ट 2019 सूचनेनुसार प्रत्येक प्रमाणपत्र/कर लेखा परिक्षण अहवाल आणि त्यांच्या सभासदांकडून विविध नियामकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणित कागदपत्रांवर, www.icai.org या ICAI संकेतस्थळावरून UDIN मिळवून तो नमूद करणे अनिवार्य केले आहे.  बोगस लेखा परिक्षकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रमाणिकरणाला आळा घालण्यासाठी हे बंधन घालण्यात आले आहे.

आयकर विभाग हा इतर संबधित सरकारी प्रतिनिधीसंस्था आणि मुख्य संस्था यांमधील समन्वयासाठी काम करत आहे. या अंतर्गत, लेखापरिक्षकांना त्यांच्याकडील प्रमाणित कागदपत्रांवर भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पोर्टलवरून दिल्या जाणाऱ्या युनिक डॉक्युमेंट आयडेंटीफिकेशन क्रमांकाच्या (UDIN) वैधतेसाठी ई-फाईलिंग पोर्टलचे भारतीय सनदी लेखापाल संस्थेच्या पोर्टलशी एकत्रीकरण पूर्ण झाले आहे.

या आवश्यकतेनुसार आयकर ई-फाईलिंग पोर्टलने या आधीच म्हणजे 27 एप्रिल 2020 पासून आयकर कायदा 1961 नुसार प्रमाणित कागदपत्रांवर  UDIN असणे अनिवार्य केले होते. सिस्टीम मधील सुधारणांनुसार , लेखापरिक्षण अहवाल/ प्रमाणपत्रांवरील लेखापरिक्षकाने दिलेला क्रमांक ICAI कडून ऑनलाईन प्रमाणित करून घेता येईल. ICAI कडून प्रमाणिकरणानंतर  अयोग्य वा खोटी कर प्रमाणपत्रे किंवा कर लेखा परिक्षण यांना आळा बसण्यास मदत होईल.

जर एखाद्या कारणामुळे लेखा परिक्षकाला लेखा परिक्षण अहवाल/ प्रमाणपत्र सादर करण्यापूर्वी UDIN देता आला नाही तर आयकर इ-फाईलिंग पोर्टल हे अशा सबमिशनसाठी इ-फाईलिंग पोर्टलवर फॉर्म दिल्यापासून 15 कॅलेंडर दिवसांच्या आत मिळवलेला UDIN ग्राह्य धरते. परंतू फॉर्म दिल्यापासून  15 कॅलेंडर दिवसांपर्यंत UDIN न मिळाल्यास त्या फॉर्मचे सबमिशन अवैध ठरते.

 

 

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1676239) Visitor Counter : 176