वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्याकडून भारतासाठी शाश्वत विकास उद्दिष्ट गुंतवणूकदार आराखडा (SDG Map)प्रसिद्ध
आर्थिक परतावा आणि उत्प्रेरक विकास परिणाम साधत गुंतवणूक संधी असलेली 18 गुंतवणूक संधी क्षेत्रे 6 शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG-enabling)क्षेत्रात आहेत
Posted On:
26 NOV 2020 3:29PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 26 नोव्हेंबर 2020
संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम UNDP आणि इन्व्हेस्ट इंडिया यांनी भारतासाठी शाश्वत विकास उद्दिष्ट गुंतवणूकदार आराखडा (SDG Map) प्रसिद्ध केला आहे. यानुसार 6 शाश्वत विकास उद्दिष्ट (SDG-enabling) क्षेत्रात 18 गुंतवणूक संधी क्षेत्रे (IOAs) आहेत, ज्यामुळे भारताला शाश्वत विकासाच्या दृष्टीने पुढील पावले उचलणे शक्य होईल.
“शाश्वत विकास उद्दिष्टांच्या (SDGs च्या) यशात भारत जागतिक पातळीवर महत्वाची भूमिका बजावेल. इन्व्हेस्ट इंडियाला संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमासह संयुक्तरित्या हा पहिलावहिला शाश्वत विकास उद्दिष्ट गुंतवणूकदार आराखडा (SDG Map) प्रसृत करताना इन्व्हेस्ट इंडियाला आनंद होत आहे. भारताच्या विकास उद्दिष्टांच्या मार्गावरील हा एक महत्वाचा कार्यक्रम असेल आणि त्यासाठी सध्यापेक्षा उत्तम वेळ कोणतीच नसेल. आमचे माहितीच्या पायावर आधारित संशोधन आणि दूरदृष्टी ही आम्हाला भारतातील शाश्वत विकास आणि गुंतवणूकदार यांच्यातील दरी कमी करण्यास मदत करेल”, असे उद्गार इन्व्हेस्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक दिपक बागला यांनी लाँचिंग कार्यक्रमात काढले.
शोको नोडा, UNDP भारताचे स्थानिक प्रतिनिधी यावेळी म्हणाले, “हा आराखडा भारतात अगदी योग्य वेळी आला आहे. कोविड-19 प्रकोपात भारतातील शाश्वत विकासासाठी गुंतवणूकदारांमधील आर्थिक दरी आधिक रुंदावली आहे. आणि कित्येक दशकांची विकासप्रक्रिया उलट पावले टाकू लागेल अशी शक्यता दिसत आहे. या वेळी शाश्वत विकास गुंतवणूकदार आराखडा हा भविष्यातील धोक्यांची संभावना कमी करण्यास सहाय्यकारी ठरेल आणि आपली अर्थव्यवस्था तसेच समाजिक व्यवस्था आधिक लवचिक आणि शाश्वत बनवेल. उत्पादकता, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आणि सर्वसमावेशकता ही या आराखड्याची वैशिष्ट्ये असून गुंतवणुकदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वाधिक आकर्षक क्षेत्रांची चाचपणी केली जाईल.”
U.Ujgare/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1676043)
Visitor Counter : 243