दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
15 जानेवारी 2021 पासून लँडलाइन फोनवरून मोबाइलवर कॉल करताना त्या क्रमांकापूर्वी ‘0’ लावणे अनिवार्य असेल
यामुळे भविष्यातील वापरासाठी नवे क्रमांक देण्यासाठी जागा मोकळी होईल
Posted On:
25 NOV 2020 9:33PM by PIB Mumbai
दूरसंचार विभागाने “फिक्स्ड लाइन आणि मोबाईल सर्व्हिसेससाठी पुरेशी क्रमांक संसाधने सुनिश्चित करण्याबाबत ” ट्राय अर्थात दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या शिफारशी विचारात घेऊन पुढील बाबींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहेः
सर्व फिक्स्ड म्हणजेच लँडलाइनवरून मोबाइलवर कॉल करताना 15 जानेवारी 2021 पासून आधी ‘0’ लावावा लागेल.
लँडलाइन ते लँडलाइन, मोबाईल ते लँडलाइन आणि मोबाइल ते मोबाइल कॉल करताना कोणताही बदल होणार नाही.
जेव्हा एखादा ग्राहक ‘0’ न लावता मोबाइलवर लॅण्डलाइनवरून फोन करेल तेव्हा योग्य घोषणा ऐकू येईल. .
सर्व लॅण्डलाइन ग्राहकांना ‘0’ डायलिंगची सुविधा दिली जाईल.
यामुळे अंदाजे 2539 दशलक्ष क्रमांकाची मालिका निर्माण होणे अपेक्षित आहे. हे भविष्यातील वापरासाठी पर्याप्त क्रमांक मोकळे करेल.
यामुळे पुरेसे क्रमांक मोकळे झाल्यामुळे भविष्यात अधिक क्रमांक वितरित करता येतील ज्याचा लाभ मोठ्या प्रमाणात मोबाइल ग्राहकांना होईल .
सदस्यांची कमीतकमी गैरसोय होईल आणि आवश्यक क्रमांक मोकळे होतील या उद्देशाने वरील बदल केले गेले आहेत.
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1675873)
Visitor Counter : 235