शिक्षण मंत्रालय
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी 'शून्य से सक्षमीकरण' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले
केंब्रिज विद्यापीठाने भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कौतुक केले आणि शैक्षणिक सुधारणांचे नेतृत्व करणाऱ्या केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा गौरव केला
प्रविष्टि तिथि:
25 NOV 2020 8:22PM by PIB Mumbai
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी 24 नोव्हेंबर, 2020 रोजी श्री अरबिंदो सोसायटीच्या वतीने आयोजित ‘शुन्य से सशक्तीकरण’ विषयावरील आभासी राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. देशभरातील डिजिटल प्लॅटफॉर्मशी संबंधित शिक्षण अधिकारी आणि शिक्षक यावेळी उपस्थित होते.
पोखरियाल यांनी कोविड -19 साथीच्या काळात केलेल्या कार्याबद्दल 40 पेक्षा जास्त शिक्षण अधिकाऱ्यांचा त्यांच्या नेतृत्वाबद्दल आणि 26 शिक्षकांच्या अभिनव कार्याबद्दल गौरव केला. मंत्र्यांनी 'इनोव्हेशन अँड लीडरशिप केसबुक - कोविड एडिशन' देखील प्रकाशित केले. ह्या ई-पुस्तकामध्ये शिक्षण अधिकारी व शिक्षकांच्या अभिनव प्रयत्न आणि कार्याचा समावेश आहे.
श्री अरविंदो घोष यांचे स्मरण करत पोखरियाल यांनी, भारताच्या शैक्षणिक वारशाचा गौरवशाली भूतकाळ पुन्हा विषद केला, जिथे नालंदा आणि तक्षशिलासारख्या जगातील प्रसिद्ध विद्यापीठांचा उत्कर्ष झाला आणि “वसुधैव कुटुंबकम” या घोषणेसह त्यांनी जगभरातील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले.
केंद्रीय मंत्री म्हणाले की एनईपी 2020 हा या देशातील शैक्षणिक इतिहासातील सर्वात व्यापक आणि धोरणात्मक दस्तऐवज आहे. जगातील आघाडीचे विद्यापीठ असलेल्या केंब्रिज विद्यापीठाने भारताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कौतुक केले आणि एक सुसंगत शिक्षण प्रणाली तयार करण्याकरीता शिक्षण सुधारणांचे नेतृत्व केल्याबद्दल केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांचा गौरव केला. केंब्रिज पार्टनरशिप फॉर एज्युकेशन, केंब्रिज युनिव्हर्सिटी जगभरात सरकारबरोबर सहकार्याने दर्जेदार शिक्षण प्रणाली विकसित करत आहे.
***
M.Chopade/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1675815)
आगंतुक पटल : 192