श्रम आणि रोजगार मंत्रालय

उमंग ऍपवर सर्वाधिक व्यवहार केल्याबद्दल ईपीएफओला प्लॅटिनम पार्टनर पुरस्काराने गौरवण्यात आले

Posted On: 25 NOV 2020 7:32PM by PIB Mumbai

 

उमंग ऍपला  तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मागील सहा वर्षातील सर्व सेवामधील सरासरी व्यवहारांच्या आधारे  केंद्र आणि राज्यांच्या भागीदार विभागांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या उमंग  पुरस्कारांचे अनावरण केले. उमंग ऍपवर  25 लाखाहून अधिक व्यवहारांची नोंद केल्याबद्दल कर्मचार्‍यांच्या भविष्यनिर्वाह निधी संघटनेला (ईपीएफओ) प्लॅटिनम पार्टनर पुरस्काराने गौरवण्यात आले .

बहुतांश ईपीएफओ सदस्य सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांचे असल्यामुळे ईपीएफओच्या कोट्यवधी सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी एक सुगम्य  आणि परवडणारा उपाय  आवश्यक होता. उमंग ऍपने  त्याच्या सेवा विशेषत: दुर्गम भागात राहणाऱ्या  सदस्यांसाठी सुलभ  आणि चोवीस तास उपलब्ध केल्या.  यामुळे उमंगवर ईपीएफओ सेवा सुरू झाली.

उमंग ऍप  वापरुन ईपीएफओ सदस्य आपल्या मोबाइल फोनवर ईपीएफओच्या 19 वेगवेगळ्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. सदस्याला  पासबुक पाहता येऊ शकतेयूएएन कार्यान्वित करता येते, दाव्यांची सद्यस्थिती पाहता येतेयोजनेच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतोयूएएन बरोबर आधार जोडता येतेजीवनप्रमाण अद्ययावत करू शकतो, तक्रार नोंदवता येते, ईपीएफओ कार्यालयाचा पत्ता मिळू शकतो. या सेवा मिळवण्यासाठी आधार संलग्न सक्रिय  यूएएन  (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) आणि ईपीएफओकडे मोबाइल नंबर नोंदणीकृत असणे  आवश्यक आहे.

चालू आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत उमंग ऍपवर  सदस्यांनी एकूण 7.91 लाख दावे दाखल केले आहेत. उमंग ऍपवर  ईपीएफओच्या सेवा सर्वात लोकप्रिय आहेत. ऑक्टोबर 2019  ते सप्टेंबर 2020 या कालावधीत ऍपवर 42.63  कोटी हिट आले, त्यापैकी 37.93  कोटी हिट ईपीएफओच्या सेवांशी संबंधित होते.

 

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675771) Visitor Counter : 151