रसायन आणि खते मंत्रालय

राष्ट्रीय औषध उत्पादक सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशात केंद्रीय मंत्री सदानंद गौडा म्हणाले, की सरकार औषधी कंपन्या आणि पोषक औषधी उत्पादने (न्यूट्रास्युटीकल) यांच्यासाठी औद्योगिक वसाहतीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.

Posted On: 22 NOV 2020 10:34PM by PIB Mumbai

 

सदानंद गौडा यांनी राष्ट्रीय औषध उत्पादन सप्ताहानिमित्त आंतरराष्ट्रीय औषध उत्पादकांच्या 21.11.2020 रोजी झालेल्या वेबिनारमध्ये दिलेल्या संदेशात म्हटले आहे, की सरकार सक्रीय फार्मास्यूटीकल इन्ग्रेडियंट, औषधोत्पादने आणि पोषक औषधोत्पादने(न्यूट्रास्युटीकल) यांच्यासाठी औद्योगिक वसाहतीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे.

केंद्रीय रसायने आणि उर्वरक मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या अनुपस्थितीत पार पडलेल्या राष्ट्रीय औषधे उत्पादक सप्ताह 2020 याचे लक्ष्य  औषध उत्पादकांची व्यावसायिक प्रतिमा उंचावणे हे होते. आपल्या संदेशात, जो आर.आर.कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य  डॉ. नारायण स्वामी यांनी वाचून दाखवला, त्यात श्री. गौडा यांनी एनपीडब्ल्यूच्या समारंभाच्या संकल्पनेची प्रशंसा केली आणि ते म्हणाले, की  कोविड विरूद्ध मजबूत लढा देण्यात  आणि विपरीत आरोग्य स्थितीत आघाडीवरील  औषध उत्पादकांनी मोठी भूमिका बजावली. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, की फार्मसी व्यावसायिक उद्योग  जागतिक दर्जाची जेनेरिक औषधांचा वापर करण्याच्या आणि लस तयार करण्यासाठीर नेहमीच पुढे आले आहेत.  येत्या काही दिवसांत भारतात कोविड-19 च्या लसीचे उत्पादन होईल. डॉ. गिरीश पै, शैक्षणिक औषध उत्पादक  यांनी दर्जेदार पुस्तकातून  आणि  मूलभूत संशोधन करून संशोधन पत्रिकांमधून संशोधित करुन ,संपादित केलेल्या फार्मास्यूटीकल कन्झ्युमर कंम्प्लेंट्स या शैक्षणिक मार्गदर्शक आणि औषधी उद्योग आणि व्यावसायिक यांना उपयुक्त असलेल्या मणिपाल विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या पुस्तकासह इतर पुस्तके आणि संशोधित पत्रिकांबद्दल त्यांचे कौतुक केले. सदानंद गौडा यांनी औषध उत्पादकांना  सामाजिक उन्नती आणि प्रगतीसाठी उत्तम कार्य करण्यासाठी प्रोत्साहित केले.

मंत्री म्हणाले की भारत सरकार देखील औषध निर्माण व्यवसाय आणि त्याच्या उद्योगाच्या सुधारणेसाठी कटीबध्द आहे. मंत्री महोदय पुढे म्हणाले, की सरकार सक्रीय फार्मास्यूटीकल इन्ग्रेडियंट, औषधोत्पादने आणि पोषक औषधोत्पादने (न्यूट्रास्युटीकल) यांच्या उद्योगाच्या अधिक वाढीसाठी औद्योगिक वसाहतीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. यामुळे भारतीय औषधी उद्योग जगात पुढे येईल.

आयपीईआर पुणेचे  संचालक डॉ. महेश बुरांडे यांनी उदघाटनपर भाषणात फार्मासिस्टनी आपले समुपदेशन कसे विकसित करावे आणि समाजाला देत असलेली सेवा कशी सुधारावी, याबाबत अनेक उत्साहवर्धक सकारात्मक मुद्दयांची मांडणी केली.

प्रा. रवींद्र यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात फार्मास्यूटीकल केअर आणि फार्मास्यूटीकल प्रॅक्टीस यांचा आरोग्य सुधारणेमध्ये असलेल्या बहुमुखी भूमिकेचे महत्त्व विषद केले. त्यांनी फार्मसिस्ट्सना आणि फार्म उद्योगाला फार्मापार्क आणि इतर महत्त्वाची धोरणे आणि कायदे करून नेहमीच सहाय्य करणाऱ्या  केंद्र सरकारचे  आभार मानले.

केआरपीएचे अध्यक्ष, डॉ. कौशिक देन्वाराजू यांनी सर्वांचे आभार मानले. केआरपीएचे सल्लागार सदस्य सुनील चिपळूणकर यांनी आयपीएची भूमिका आणि त्यांचे विविध उपक्रम यावर प्रकाश टाकला.

***

S.Thakur/S.Patgaonkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1674977) Visitor Counter : 97