सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने वाराणसीत खादीचे प्रदर्शन केले आयोजित
Posted On:
22 NOV 2020 9:30PM by PIB Mumbai
खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने (KVIC) वाराणसी येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय खादी प्रदर्शनात जम्मू आणि काश्मीरमधील दर्जेदार, सर्वाधिक उंचीवरील मध,हाताने बनविलेले रेशमी कापड,सुती आणि लोकरीचे कपडे आणि वनौषधी यांचा या प्रदर्शनात समावेश आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष श्री. विनय कुमार सक्सेना यांच्या हस्ते झाले.
उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, बिहार, झारखंड, राजस्थान आणि पंजाब अशा 8 राज्यांतील शेकडो खादी प्रशिक्षित कारागिरांनी या प्रदर्शनात आपले 90 स्टाँल्स लावले असून खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने कोविड-19 च्या टाळेबंदी नंतर आयोजित केलेला हा दुसरा अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. हे प्रदर्शन दिनांक 22 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर पर्यंत म्हणजे 15 दिवस सुरू रहाणार आहे. या वर्षी ऑक्टोबर महिन्यात टाळेबंदीनंतर पहिले खादीचे प्रदर्शन लखनौ येथे आयोजित करण्यात आले होते.
जम्मू आणि काश्मीरमधील खादीच्या संस्था आणि पंतप्रधान रोजगार निर्माण योजनेतील (PMEGP units) युनिट्सनी आणलेला सर्वाधिक उंचीवरील मध, काश्मीरमधील लोकर आणि शाली ही उत्पादने प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण ठरली आहेत. काश्मीर व्यतिरिक्त उत्तराखंड येथील सर्वोच्च उंचीवरील मध देखील ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करत आहेत, ज्यांना वारासणीत अशा प्रकारचा मध सहजासहजी उपलब्ध होत नाही. या मधाच्या उत्तम दर्जा आणि चवीमुळे हा मध देशभरात प्रचंड लोकप्रिय आहे. पंतप्रधानांनी देखील मधमाशी उत्पादकांना अशा जागतिक स्तरावर मोठी मागणी असलेल्या सर्वाधिक उंचीवरील मधाचे उत्पादन वाढविण्यासाठी आवाहन केले होते. केव्हीआयसीने काश्मीरमधील उंचावरील भागात हजारो मधमाश्यांच्या पेट्या स्थानिक युवकांना वितरित केल्या, त्यामुळे या केंद्रशासित प्रदेशातील मध उत्पादन वाढले आहे.
यावेळी बोलताना केव्हीआयसीचे अध्यक्ष श्री. सक्सेना म्हणाले," वाराणसीतील राज्यस्तरीय खादी प्रदर्शन हे अशा खादी कारागिरांचे प्रदर्शन आहे, ज्यांनी कठिण काळात आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी चरखा फिरवत ठेवला आणि आत्मनिर्भर भारताकडे जाण्यासाठी वाटचाल सुरू ठेवली. विशेषतः वाराणसी जो पंतप्रधानांचा संसदीय मतदारसंघ आहे, तेथे अशाप्रकारे खादीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कारागिरांना संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात आले आहेत. वाराणसीत सध्या एकूण 134 खादी संस्था असून त्यातील कामगारवर्गात 80% महिलांचा समावेश आहे.
M.Chopade/S.Patgoankar /P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674969)
Visitor Counter : 183