इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उमंग मोबाईल अॅपला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ऑनलाईन परिषदेचे आयोजन
उमंग मोबाईल अॅपची आंतरराष्ट्रीय आवृत्ती निवडक देशांसाठी परिषदेदरम्यान सुरु केली जाणार
उमंग अॅपच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीमुळे परदेशातील भारतीय विद्यार्थी, एनआरआय आणि भारतीय पर्यटकांना भारत सरकारच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात मदत होणार
Posted On:
21 NOV 2020 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020
उमंग मोबाईल अॅप ने (युनिफाईड मोबाईल अॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गवर्नन्स) तीन वर्षे आणि 2000 पेक्षा अधिक सेवांचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, संचार आणि विधी व न्याय खात्याचे मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4.00 वाजता ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. परिषदेचा उद्देश 20 भागीदार विभागांकडून सूचना/अभिप्राय स्वीकारणे हा आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था, थेट लाभ हस्तांतरण योजना विभाग, कर्मचारी राज्य विमा महामंडळ, आरोग्य मंत्रालय, शिक्षण मंत्रालय, कृषी, पशुसंवर्धन आणि कर्माचारी निवड आयोग (एसएससी) हे उमंगचे प्रमुख भागीदार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या समन्वयाने उमंगची आंतरराष्ट्रीय आवृत्ती परिषदेदरम्यान सुरु करण्यात येणार आहे. ही आवृत्ती अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युएई, नेदरलँडस, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या निवडक देशांसाठी सुरु करण्यात येणार आहे. यामुळे भारतीय आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, एनआरआय, परदेशातील भारतीय पर्यटक यांना भारत सरकारच्या सेवांचा कोणत्याही वेळी लाभ घेता येईल. तसेच यामुळे उमंगवर उपलब्ध असणाऱ्या भारतीय सांस्कृतिक सेवांमुळे भारताला जागतिक पातळीवर नेण्यास मदत होईल आणि परदेशी पर्यटकांमध्ये भारताला भेट देण्याविषयी आवड निर्माण होईल.
उमंग मोबाईल अॅप (युनिफाईड मोबाईल अॅप्लीकेशन फॉर न्यू-एज गवर्नन्स) हा भारत सरकारचा ऑल-इन-वन एकल, एकीकृत, सुरक्षित, बहुविध, बहु-भाषी, बहु-सेवा मोबाईल अॅप आहे. याद्वारे केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागाच्या उच्च प्रभावित सेवा प्रदान केल्या जातात.
उमंगची निर्मिती राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभाग (NeGD), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केली आहे. याचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 23 नोव्हेंबर 2017 रोजी 163 सेवांसह करण्यात आले होते. अल्पावधीतच प्रतिष्ठेचा उत्कृष्ट एम-शासन सेवा पुरस्कार , उमंगला फेब्रुवारी 2018 मध्ये दुबई येथे झालेल्या 6 व्या जागतिक शासकीय परिषदेत प्रदान करण्यात आला.
“पॉवर टू एम्पॉवर” या डिजिटल इंडियाच्या उद्दिष्ठानुसार उमंग मोबाईल अॅप म्हणजे एकाच मोबाइल अॅपवरून अनेक सरकारी सेवा सुलभ आणि सहजरित्या उपलब्ध करुन देणे आहे.
उमंगवर सध्या 2039 सेवा उपलब्ध आहेत (88 केंद्रीय विभागाच्या 373 सेवा, 27 राज्यांच्या 101 विभागाच्या 487 सेवा आणि 1179 सेवा उपयोगिता बिल देयके) या आहेत आणि यात निरंतर वाढ होत आहे.
उमंग मोबाईल अॅप अँड्राईड, आयओएस, सर्व वेब ब्राऊझर्स प्लॅटफॉर्म आणि निवडक 80 सेवा केएआयओएसवर (जिओ फिचर फोनवर) उपलब्ध आहे. उमंग आतापर्यंत 3.75 कोटी व्यक्तींनी डाऊनलोड केला आहे आणि ~2.5 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत, सरारसी प्ले स्टोअर श्रेणी>4 आहे, 136 हजार वापरकर्ते आहेत.
उमंग अॅप डाऊनलोड करण्यासाठी 97183-97183 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या तसेच पुढील संकेतस्थळावरुनही डाऊनलोड करता येईल:
- वेब: https://web.umang.gov.in/web/#/
- अँड्राईड: https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.umang.negd.g2c
- आयओएस: https://apps.apple.com/in/app/umang/id1236448857
* * *
Jaydevi PS/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674772)
Visitor Counter : 282