संरक्षण मंत्रालय
राष्ट्रीय छात्रसेनेचा 72 वा वर्धापनदिन साजरा
Posted On:
21 NOV 2020 4:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020
जगातील सर्वात मोठी गणवेषधारी युवा संघटना, एन सी सी अर्थात राष्ट्रीय छात्र सेना (नॅशनल कॅडेट कॉर्प्स) उद्या दिनांक 22 नोव्हेंबर 2020, रोजी आपला 72 वा वर्धापनदिन साजरा करत आहे. या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात आज, आपले जीवन धारातीर्थी देण्याचा सर्वोच्च त्याग करणाऱ्या नायकांना, राष्ट्रीय युध्द स्मारकावर जाऊन आदरांजली वाहून करण्यात आली. संरक्षण सचिव डॉ.अजयकुमार आणि राष्ट्रीय छात्रसेनेचे उपव्यवस्थापक लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा यांनी सर्व छात्रसैनिक बांधवांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण केले.
संरक्षण सचिव म्हणाले, "एनसीसी कॅडेट्स यांनी यंदाच्या वर्षी कोविड महामारीविरूध्द लढण्यासाठी उपाययोजना करण्याच्या जनजागृती कार्यात स्वतःला झोकून देत 'माजी एनसीसी योगदान' या अंतर्गत, सहभागी झाले होते." छात्रसैनिक आणि त्यांच्या सहकारी एनसीसी अधिकाऱ्यांनी 'एक भारत श्रेष्ठ भारत', 'आत्मनिर्भर भारत', 'फिट इंडिया', 'स्वच्छता अभियान', 'प्रदूषण महापंधरवडा' (मेगा पोल्युशन पखवाडा), अशा मोहिमाचे नेतृत्व केले तसेच विविध सरकारी उपक्रम उदाहरणार्थ, 'डिजिटल साक्षरता', 'आंतरराष्ट्रीय योगदिन', वृक्षारोपण आणि 'लसीकरण मोहीम' यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.
देशाच्या सीमावर्ती आणि किनारपट्टीच्या भागात नॅशनल कॅडेट काॅर्प्स या योजनेचा विस्तार करण्याची योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी जाहीर केली होती. संरक्षण सचिव म्हणाले," एनसीसीचा सीमावर्ती आणि किनारपट्टीवरील भागात विस्तार झाल्यास तेथील युवा वर्गाला सशस्त्र सैन्य दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळेल."
एनसीसी वर्धापनदिन भारतभर छात्रसैनिक रक्तदान शिबिरे आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करत आहेत.
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674717)
Visitor Counter : 225