संरक्षण मंत्रालय
जाट रेजिमेंटने आपला 225 वा स्थापना दिवस केला साजरा
Posted On:
21 NOV 2020 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2020
जाट तुकडीने (रेजिमेंटने) आपल्या प्रतिष्ठित आणि नामांकित सेवेची 225 वर्षे 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी साजरी केली.
लेफ्टनंन्ट जनरल एसके सैनी, पीव्हीएसएम, एव्हीएसएम, वायएसएम, व्हीएसएम, एडीसी, व्हीसीओएएस आणि जाट रेजिमेंटचे कर्नल या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जाट वॉर मेमोरिएल येथे पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला, तुकडीचे नेत्रदिपक संचलन आणि जोरा तुकडीच्या दिग्गजांशी भेट असा कार्यक्रम झाला.
कोविड-19 च्या महामारीमुळे, सर्वप्रकारच्या सुरक्षा उपायांचे पालन करीत हा कार्यक्रम लहान स्वरूपात घेण्यात आला.
* * *
S.Tupe/S.Shaikh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674695)
Visitor Counter : 146