अर्थ मंत्रालय

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची जी -20 राष्टांच्या अर्थमंत्र्यांच्या आभासी बैठकीला उपस्थिती

Posted On: 20 NOV 2020 8:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  20 नोव्हेंबर 2020

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री श्रीमती निर्मली सीतारमण आज झालेल्या जी -20  राष्टांच्या अर्थमंत्र्यांच्या आभासी बैठकीत सहभागी झाल्या होत्या. कोविड-19 मुळे निर्माण झालेली  जागतिक आर्थिक  परिस्थिती आणि या संकटाचा सामना करण्यासाठी सुरू केलेली सामूहिक जागतिक कृती पुढे नेण्याच्या यासंदर्भात जी - 20 राष्ट्रांची भूमिका यावर  या बैठकीत  जी- 20 देशांच्या अर्थमंत्र्यांची आपले विचार मांडले .

कोविड -19 च्या  संकटातून बाहेर पडण्यासाठी जी-20 सदस्यांनी आणखी प्रयत्न  करण्याची गरज व्यक्त करत अर्थमंत्री सीतारमण यांनी सर्वांना उपलब्ध होईल आणि परवडेल अशा लसीच्या आवश्यकतेवर भर दिला. श्रीमती सीतारमण यांनी जी -20 च्या आर्थिक प्रतिसादाचा मुख्य आधार  जी-20 च्या कृती आराखडा आहे असे सांगत आमच्या  तात्काळ प्रतिसादाला समन्वय साधण्याबरोबर हा आराखडा, आपल्या अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याच्या दीर्घकालीन  प्रयत्नासाठी मार्गदर्शक  ठरतो  असे सांगितले.  सौदी अरबच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जी- 20 बैठकीतील कर्ज सुविधा निलंबन उपाय,हे महत्त्वाचे फलित  आहे हे अधोरेखीत करुन अर्थमंत्र्यांनी , जी-20 सदस्य देशांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सामुहिक आणि समन्वित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे यावर भर दिला.

कोविड-19 संक्रमणाला प्रतिसाद देण्याच्या जी- 20 ची विषयपत्रिका राबवण्याच्या अविरत प्रयत्नांबद्दल सौदी अरबचे  त्यांनी अभिनंदन केले. अर्थमंत्री म्हणाल्या की, 2020 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या इटलीच्या अध्यक्षीय कारकिर्दीत ट्रोइका सदस्य म्हणून काम करण्यास भारत उत्सुक आहे.   

 

Jaydevi P.S./S.Thakur/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1674551) Visitor Counter : 135