नागरी उड्डाण मंत्रालय
‘उडान’ योजनेअंतर्गत हैद्राबाद-नाशिक दरम्यान स्पाइस जेटच्या विमानसेवेला प्रारंभ
Posted On:
20 NOV 2020 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर 2020
भारत सरकारच्या आरसीएस-उडान (प्रादेशिक संपर्क योजना- उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत देशामध्ये हवाई संपर्क यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी पावले टाकली आहेत. यामध्ये तेलंगणातल्या हैद्राबाद ते महाराष्ट्रातल्या नाशिक शहराला जोडणारी दुसरी थेट हवाई सेवा आजपासून सुरू करण्यात आली. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सुनील पाटील, त्याचबरोबर एनआयएमएच्या नाशिक पायाभूत सुविधा समितीचे अध्यक्ष मनीष रावळ आणि नाशिकच्या एचएएल विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेषगिरी राव यांनी या उडान सेवेतल्या विमानाला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी नागरी उड्डाण मंत्रालयाचे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते. उडान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 297 हवाई मार्गांवर आणि 53 विमानतळांवरून विमान सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
हैद्राबाद-नाशिक मार्गावर अलायन्स एअरच्या उड्डाणाला चांगले यश मिळाल्यानंतर आता स्पाइसजेटने या मार्गावर थेट हवाईसेवा सुरू केली आहे. आरसीएस उडान-2 च्या लिलाव बोली प्रक्रियेअंतर्गत स्पाइसजेटला हैद्राबाद-नाशिक मार्गाचा लिलाव बहाल करण्यात आला. सर्वसामान्यांना परवडणा-या दरामध्ये विमान प्रवासाचे तिकीट ठेवून ‘व्यवहार्यता तफावत निधी (व्हीजीएफ) अंतर्गत’ उडान योजनेतून ही सेवा देण्यात येत आहे. यामध्ये आठवड्यातून चार उड्डाणे होणार असून 78 आसनांचे क्यू 400 एअरक्राफ्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्पाइस जेटव्दारे उडान अंतर्गत जोडले गेलेले नाशिक हे 14 वे शहर आहे.
व्यापार, पर्यटनाच्या संधी यामुळे प्रवाशांकडून हैद्राबाद आणि नाशिक या दोन्ही शहरांमध्ये हवाई सेवेची मागणी मोठ्या प्रमाणावर आली आहे. नाशिक हे एक तीर्थक्षेत्रहीअसून दर बारा वर्षांनी इथे कुंभमेळा भरतो. याशिवाय शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या मंदिरांमध्ये दर्शनासाठी अनेक भाविक येतात. नाशिक शहरातलीही अनेक मंदिरे प्रसिद्ध असून त्यासाठीही असंख्य भाविक येतात. त्याचबरोबर द्राक्ष उत्पादक आणि मद्य उत्पादकांच्या दृष्टीने नाशिक अतिशय महत्वाचे शहर आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या विमानांची निर्मिती नाशिकमध्ये केली जाते. मिग आणि एसयू विमानांची तसेच के-13 क्षेपणास्त्रांची निर्मितीही याच शहरात होते. या व्यतिरिक्त नाशिकमध्ये महिंद्र अँड महिंद्र, बॉश, एबीबी, क्रॉम्पटन ग्रीव्हज, थायसेनकृप, सीएट अशा विविध कंपन्या कार्यरत आहेत.
या विमानसेवेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे:-
Flight Number
|
Dept Arp
|
Arvl Arp
|
Dept Time
|
Arrv Time
|
Block Time
|
Frequency
|
2789
|
HYD
|
ISK
|
10:35
|
12:05
|
1:30
|
Tuesday, Wednesday, Thursday, Friday
|
2790
|
ISK
|
HYD
|
12:35
|
14:10
|
1:35
|
Tuesday, Wednesday, Thursday, Friday
|
Jaydevi P.S./S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1674505)
Visitor Counter : 161