संरक्षण मंत्रालय

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची निवडक भाषणे लोकतंत्र के स्वर आणि  द रिपब्लिकन एथिक प्रकाशित केली


राष्ट्रपती कोविंद लोकसेवा हाच सर्वोच्च  धर्म मानतात  जे त्यांच्या भाषणांमधून स्पष्ट होते: राजनाथ सिंह

Posted On: 19 NOV 2020 9:13PM by PIB Mumbai

 

संरक्षण  मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या "लोकतंत्र के स्वरआणि  ‘The Republican Ethic " ही  निवडक भाषणांची तिसरी आवृत्ती आज नवी दिल्लीत प्रकाशित केली. यावेळी   केंद्रीय  पर्यावरणवन आणि हवामान बदलमाहिती व प्रसारण आणि अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम, मंत्री  प्रकाश जावडेकर आणि इतर मान्यवर  उपस्थित होते.

यावेळी बोलताना  राजनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या भाषणांचे हे संकलन त्यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्त्वाचे आणि मूल्यांचे विस्तृत चित्र सादर करतात.  या भाषणांमध्ये, एक संवेदनशील आणि आदर्शवादी लोक सेवक, नीतिमत्तेवर आधारित जीवन जगणाऱ्या एका  निष्पक्ष व्यक्तीचे  प्राधान्यक्रम आढळतात . ते म्हणाले की राष्ट्रपती लोकसेवेला सर्वोच्च  धर्म मानतात जे त्यांच्या अनेक भाषणांमधून स्पष्ट होते. राष्ट्रपती आपल्या भाषणांमध्येही भारतीय मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करतात ज्याचा जास्त प्रभाव पडतो कारण ही मूल्ये त्याच्या वैयक्तिक जीवनाचा भाग आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलताना सांगितले की राष्ट्रपतींच्या शब्दांमध्ये आणि कृतीत कोणतेही अंतर नाही जे महान व्यक्तिमत्त्वांचे चिन्ह आहे. संभाषणांमध्ये ते अनेकदा ऐकणार्‍यावर खोलवर प्रभाव टाकतात. त्यांचे भाषण नैसर्गिक आणि साध्या मार्गाने ओघवते असे असते, जे विनम्रता, गरीबांची सेवा, सहानुभूती आणि सर्व प्राण्यांबद्दल करुणा या मूलभूत गोष्टीं प्रतिबिंबित करते.

आशा-आकांक्षा, त्या पूर्ण करण्याच्या संधी आणि  भविष्यातील भारताची संकल्पनाया भाषणांतून स्पष्ट करण्यात आल्याचे संरक्षण मंत्री म्हणाले. ते म्हणाले की आपल्या वैविध्यपूर्ण समाज आणि संस्कृतीचे सर्व आवाज आणि आपली दोलायमान लोकशाही यांना देशातील प्रथम नागरिकाच्या भाषणांमधून अभिव्यक्त केले आहे. राजनाथ सिंह म्हणाले की, हा संग्रह समकालीन भारत समजून घेण्यासाठी एक अमूल्य दस्तऐवज असेल.

राजनाथ सिंह म्हणाले की, राष्ट्रपतींच्या भाषणांमध्ये  मुलींचे शिक्षण, महिला सक्षमीकरण, दुर्बल घटकांचे कल्याण अशा विषयांबद्दलची त्यांची चिंता दिसून येते. ज्यातून  त्यांचे मोठे मन प्रतिबिंबित होते. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो  आणि ते नेहमीच मोठे मन  व उच्च नैतिक मूल्य असलेले व्यक्तिमत्व असल्याचे जाणवले.  सर्वात  उंचावरील युद्धभूमी असलेल्या  सियाचीनसह आघाडीच्या चौक्यांना भेट देण्याच्या राष्ट्रपतींच्या इच्छेचा  उल्लेख करताना संरक्षण मंत्री म्हणाले की सीमेवर लढणार्‍या आपल्या सैनिकांचे मनोबल उंचावण्याचा त्यांचा निर्धार यातून दिसतो.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आपल्या माजी शिक्षकांच्या पायाला स्पर्श केल्याच्या घटनेचे समरण करताना राजनाथ सिंह म्हणाले की यातून  केवळ त्यांच्या गुरूंबद्दलचा आदर दिसत नाही  तर विद्यार्थ्यांसमोर  एक आदर्श देखील निर्माण केला आहे.

माहिती आणि  प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राष्ट्रपतींच्या भाषणावरील पुस्तकाची ई-आवृत्ती प्रकशित  केली. ते म्हणाले, राष्ट्रपतींच्या भाषणेचे हे संकलन देशाचा आत्मविश्वास प्रतिबिंबित करते. ज्यांना या काळातल्या भारताचा अभ्यास करायचा आहे  त्यांच्यासाठी हे पुस्तक मोलाचा संदर्भ  ठरणार आहे आणि संस्था तसेच व्यक्तींच्या ग्रंथालयांमध्येही याची मोलाची भर पडेल.

माहिती व प्रसारण सचिव अमित खरे यांनी संरक्षण मंत्री  राजनाथ सिंह आणि माहिती व प्रसारण मंत्री  प्रकाश जावडेकर यांचे या खंडांच्या प्रकाशनातील सहकार्याबद्दल आभार मानले आणि पुस्तकाच्या संकलन व निर्मितीत प्रकाशन  विभागाच्या भूमिकेचे कौतुक केले.

यावेळी संरक्षण दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे, नौदलाचे व्हाईस चीफ मार्शल हरजीत सिंह अरोरा, राष्ट्रपती सचिवालयाचे आणि  माहिती व प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या  पब्लिकेशन्स विभागाने प्रकाशित केलेले 'लोकतंत्र भावना' आणि 'रिपब्लिकन एथिक' ही भारतातील राष्ट्रपती  राम नाथ कोविंद यांच्या निवडक भाषणांच्या संकलन असलेली पुस्तके अनुक्रमे हिंदी  आणि  इंग्रजी भाषेत आहेत.  आज जाहीर झालेल्या तिसर्‍या खंडात राष्ट्रपतीपदाच्या तिसर्‍या वर्षाच्या काळात त्यांनी केलेल्या 57 निवडक भाषणांचा समावेश आहे.

 

M.Chopade/S.Kane /P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1674201) Visitor Counter : 206


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu