संरक्षण मंत्रालय

सहकार्यात्मक भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाची जागतिक व्याप्ती यावर इंडोनेशियाबरोबर वेबिनार आणि एक्सपोचे आयोजन

Posted On: 18 NOV 2020 7:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 नोव्‍हेंबर 2020


“सहकार्यात्मक भागीदारीसाठी भारतीय संरक्षण उद्योगाची जागतिक व्याप्ती :भारत इंडोनेशिया संरक्षण सहकार्य वेबिनार अँड एक्सपो” या संकल्पनेवर भारत आणि इंडोनेशिया दरम्यान वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाच्या अखत्यारीत एसआयडीएमच्या माध्यमातून याचे  आयोजन करण्यात आले होते.

पुढील पाच वर्षांत संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी आणि 5 अब्ज डॉलर्सचे संरक्षण निर्यातीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मित्र देशांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या मालिकेचा हे वेबिनार हा एक भाग होता.

दोन्ही देशांच्या  मुख्य अधिका-यांनी वेबिनारमध्ये भाग घेतला आणि सशस्त्र सैन्यदलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि संरक्षण उद्योगाच्या स्वदेशीकरणामध्ये संधीचा लाभ घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

एल अँड टी डिफेन्स, अशोक लेलँड लिमिटेड, भारत फोर्ज, टाटा एरोस्पेस अँड  डिफेन्स, एमकेयू, गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अशा विविध भारतीय कंपन्यानी  प्रमुख प्लॅटफॉर्म / उपकरणांबाबत  कंपनी आणि उत्पादनांचे  सादरीकरण केले.  इंडोनेशियाकडून  पीटी. पिंडद, पीटी. पाल, पीटी. लेन, पीटी डहाणा आणि पीटी. दिरगांतरा यांनी सादरीकरण केले.

वेबिनारमध्ये 150  हून अधिक सहभागींनी हजेरी लावली होती आणि एक्स्पोमध्ये 100 हून अधिक व्हर्चुअल प्रदर्शन स्टॉल्स उभारण्यात आले होते.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673830) Visitor Counter : 151