अर्थ मंत्रालय

दिपम (DIPAM) ने केला मालमत्ता मुद्रीकरणाच्या सल्ला सेवेसाठी  जागतिक बँकेसोबत करार

Posted On: 16 NOV 2020 9:50PM by PIB Mumbai

 

दिपम अर्थात गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (Department of Investment and Public Asset Management,DIPAM) आज (16 नोव्हेंबर 2020) जागतिक बँकेसोबत एक करार केला आहे. या कराराअंतर्गत जागतिक बँक दिपमला आपल्या मालमत्तांमधून उत्पन्न मिळविण्यासाठी सल्ला सेवा पुरविणार आहे.

कमी महत्त्वाच्या,100 कोटी  किंवा त्यापेक्षा अधिक मूल्य  असलेल्या  एनिमी  प्रॉपर्टी, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रमातील (CPSE) शासकीय मालमत्ता उत्पन्नाकरता कार्यक्षम करण्यासाठी, त्यात धोरणात्मक निर्गुंतवणूक करण्याचे  किंवा त्या  बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकार  दिपमला दिलेले असतात. दिपमकडे अशा कमी महत्वाच्या मालमत्तांमधून उत्पन्न मिळविण्यासाठी विशिष्ट चौकट आहे. अर्थमंत्र्यांनी मंजूर केलेल्या जागतिक बँकेच्या सेवाप्रणालीचे उद्दिष्ट, भारतातील सार्वजनिक मालमत्तांचे विश्लेषण करणे आणि  आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम प्रचलित पध्दतींनुसार त्यांच्या संस्थागत  आणि व्यावसायिक कार्यपद्धतीचे मूल्यमापन करणे,त्याचप्रमाणे त्यांना कार्यकारी मार्गदर्शक कार्यप्रणाली  विकसित करण्यासाठी सहाय्य करणे आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी क्षमता वाढविणे, हे आहे.

हा प्रकल्पाच्या माध्यमातून, ज्या मालमत्तांमधे पुढील गुंतवणूक होऊ शकेल किंवा ज्यायोगे आर्थिक संसाधनांत वृद्धी होऊ शकेल, अशा न वापरलेल्या/कमी वापर झालेल्या नाँन कोर मालमत्तांमधून उत्पन्न मिळवण्याच्या  प्रक्रियेला सुधारून ती  गतीशील करेल, अशी अपेक्षा आहे.

 

Jaydevi PS/S.Patgoankar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1673318) Visitor Counter : 199