युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खोट्या खेलो इंडिया जाहिरातीद्वारे अनेक खेळाडूंना फसवल्याप्रकरणी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून उत्तर प्रदेशात एफआयआर दाखल

Posted On: 04 NOV 2020 10:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2020

भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (SAI) देशभरातील  तळागाळातील तरूण खेळाडूंकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत की 2021 मध्ये हरियाणातील पंचकुला येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी अर्ज मागवण्याबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक जाहिरात पोस्ट करण्यात आली आहे. या जाहिरातीत खेलो इंडिया शिबिरात नाव नोंदवण्यासाठी खेळाडूंना 6000 रुपये जमा करण्यास सांगण्यात आले आहे तसेच चाचणीनंतर ते खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होऊ शकतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. जाहिरातीत एक दूरध्वनी क्रमांक देखील दिला आहे. प्राधिकरणाने इच्छुक असल्याचे दाखवत आग्रा येथील रहिवासी असलेल्या व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती मिळवली आहे.

या जाहिरातीमध्ये युवक कल्याण आणि  क्रीडा मंत्रालय, भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि खेलो इंडिया यांच्या लोगोचा वापर केला आहे. ज्यामुळे कित्येक खेळाडूंची ही सरकारी जाहिरात असल्याबाबत  दिशाभूल केली गेली.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाने उत्तर प्रदेश पोलिसात प्रथम माहिती अहवाल दाखल केला आहे आणि या प्रकरणाची त्वरित चौकशी करण्यास सांगितले आहे. खेलो इंडिया ही एक सरकारी योजना आहे आणि त्यामध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना पैसे देण्याची गरज नाही. एसएआय / खेलो इंडियाकडून कोणतीही चाचणी घेतली जात नाही. एसजीएफआय / एआययूने आयोजित केलेल्या शालेय स्पर्धा / विद्यापीठ स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेत भाग घेण्यासाठी पात्र ठरतात.

 

U.Ujgare/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1670325) Visitor Counter : 82