कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
जम्मूमध्ये मानसर तलाव विकास योजनेचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन
मानसर तलाव प्रकल्पाला भेट देण्यासाठी दरवर्षी 20 लाख पर्यटक येतील-डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
01 NOV 2020 5:42PM by PIB Mumbai
केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ईशान्य प्रदेश विकास; राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय; कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, पेन्शन, अणुऊर्जा आणि अवकाश डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. 70 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मानसर तलाव विकास योजना पूर्ण होत आहे. मानसर तलाव पुनर्विकास योजनेचा ई-पायाभारणी सोहळा डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते पार पडला. मागील सात दशकात हाती घेतलेल्या विकासकामांपेक्षा गेल्या 6 वर्षांतील विकासकामांची संख्या अधिक आहे, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. हा अतुलनीय विकास ठळकपणे दृष्टीक्षेपात येणारा आहे. मंत्री म्हणाले की याच्या अंमलबजावणीनंतर पर्यटकांची संख्या मानसर भागात दरवर्षी दहा लाखांवरून 20 लाख प्रतिवर्ष एवढी होईल. मानसर पुनर्विकास योजनेमुळे 1.15 कोटी मनुष्य-दिन रोजगारनिर्मिती होईल आणि वार्षिक 800 कोटी रुपये उत्पन्न मिळेल.
कथुआ लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन वर्षात 3 वैद्यकीय महाविद्यालये, उधमपूर जिल्हा देशातील कदाचित पहिला जिल्हा असेल ज्याला नमामी गंगे आणि गंगा शुद्धीकरण प्रकल्पाच्या धर्तीवर देविका नदी आणि मानसर तलाव पुनर्विकास आणि पुनरुत्थान प्रकल्प मिळाले आहेत.
देविका प्रकल्प आणि मानसर प्रकल्पासाठीचा खर्च सुमारे 200 कोटी रुपये आहे. देविका नदी गंगा नदीची बहिण असल्याचे मानले जाते तर महाभारतात मानसर सरोवराचा संदर्भ आढळतो.
डॉ जितेंद्र सिंग म्हणाले, कटरा-दिल्ली एक्सप्रेसवे कॉरीडॉरचे काम सुरु आहे आणि जम्मू राष्ट्रीय महामार्ग सहापदरी करण्यात येणार आहे. ते म्हणाले, जगातील सर्वोच्च रेल्वे पूल रियासीमध्ये होत असून सुधमहादेव ते मार्माट मार्गे खिलेनी या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्पाचे कामही सुरू झाले आहे.
जम्मू आणि काश्मीर नायब राज्यपालांचे सल्लागार बसीर अहमद खान, पर्यटन सचिव सर्मद हाफीज, विभागीय आयुक्त संजीव वर्मा, जम्मूचे पर्यटन संचालक आर के कटोच, सुरीनसर-मानसर विकास प्राधीकरणाचे सीईओ डॉ गुरविंदर जीत सिंग आणि जम्मू आणि श्रीनगरमधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची वेबिनार आणि ई-पायाभरणी सोहळ्याला उपस्थिती होती.
***
B.Gokhale/S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1669400)
Visitor Counter : 189