ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप विपणन हंगाम 2020 – 21 मधील एमएसपी व्यवहार

Posted On: 31 OCT 2020 7:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2020

 

मागील हंगामांनुसारच सरकारने सध्याच्या किमान आधारभूत किंमत योजनांच्या नुसार शेतकऱ्यांकडून खरीप 2020–21 पिके त्यांच्या एमएसपी दराने खरेदी करणे सुरू ठेवले आहे.

पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, चंदीगड, जम्मू आणि काश्मिर, केरळ आणि गुजरात या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये खरीप 2020 – 21 साठी भात खरेदी वेगाने सुरू आहे, मागील वर्षाच्या 197.19 लाख मेट्रिक टनच्या तुलनेत 30.10.2020 पर्यंत 159.76 लाख मेट्रिक टन खरेदी आहे, मागील वर्षाच्या तुलनेत ही वाढ 23.43 टक्के आहे. एकूण 197.19 लाख मेट्रिक टन खरेदीपैकी एकट्या पंजाबने 136.47 लाख मेट्रिक टन खरेदीमध्ये योगदान दिले असून ते एकूण खरेदीच्या 69.21 % इतके आहे.

साधारण 16.62 लाख शेतकऱ्यांना सध्या सुरू असलेल्या केएमएस खरेदी प्रक्रियेचा लाभ मिळाला आहे, ज्याचे एमएसपी मूल्य 37230.35 कोटी रुपये आहे.  

         

तसेच राज्यांकडून मिळालेल्या प्रस्तावाच्या आधारे मूल्य समर्थन योजनेअंतर्गत (पीएसएस) तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तरप्रदेश, ओडिशा, राजस्थान, आंध्रप्रदेश या राज्यांसाठी खरीप विपणन हंगाम 2020 च्या 45.10 लाख मेट्रिक टन डाळी आणि तेलबिया खरेदीला मान्यता देण्यात आली आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ राज्यांसाठी 1.23 लाख मेट्रिक टन खोबऱ्याच्या (बारमाही पीक) खरेदीला मंजूरी देण्यात आली आहे. इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांकडून पीएसएस अंतर्गत डाळी, तेलबिया आणि खोबरे खरेदीचे प्रस्ताव मिळाल्यानंतर मान्यता देखील देण्यात येईल जेणेकरून या पिकांच्या एपएक्यू दर्जाची खरेदी 2020 – 21 वर्षासाठी अधिसूचित एमएसपी नुसार करता येईल. जर अधिसूचित करण्यात आलेल्या कापणीच्या कालावधीत बाजार दर एमएसपी पेक्षा कमी असल्यास केंद्रिय नोडल संस्था राज्य नामांकित खरेदी एजन्सीमार्फत खरेदी केला जाईल.

31.10.2020 पर्यंत सरकारने आपल्या नोडल एजन्सीमार्फत मूग, उडीद, भुईमूग शेंगा आणि सोयाबीनची 45.51 कोटी रुपये एमएसपी मूल्याची 7966.63 मेट्रिक टन खरेदी केली असून तामिळनाडू, महाराष्ट्र आणि हरियाणा येथील 4811 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. त्याचप्रमाणे 5089 मेट्रिकन टन खोबऱ्याचे (बारमाही पीक) एमएसपी मूल्य 52.40 कोटी रुपये असून कर्नाटक आणि तामिळनाडू येथील 3961 शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. खोबरे आणि उडीद यांच्या संदर्भात बहुतांश प्रमुख उत्पादक राज्यांमधील दर एमएसपी पेक्षा अधिक आहे. खरीप डाळी आणि तेलबियांच्या आवकानुसार संबंधित राज्यांनी ठरविलेल्या तारखेपासून संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेश हे सरकारने खरेदी सुरू करावी, यासाठी आवश्यक व्यवस्था करीत आहेत.

         

पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथे एमएसपी अंतर्गत कापूस खरेदी सुरळीत सुरू आहे. 31.10.2020 पर्यंत 176068 लाख रुपये किमतीच्या 603711 कापसाच्या गाठी खरेदी केल्या असून त्याचा फायदा 114376 शेतकऱ्यांना झाला आहे.


* * *

B.Gokhale/S.Shaikh/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1669171) Visitor Counter : 121