रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या वतीने ‘ऑपरेशन मेरी सहेली’ उपक्रम


रेल्वेतील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी ‘मेरी सहेली’ मार्फत पुढाकार

Posted On: 29 OCT 2020 9:54PM by PIB Mumbai

 

भारतीय रेल्वेच्या वतीने महिला प्रवाशांच्या संपूर्ण प्रवासामध्ये सुरक्षेसाठी सर्व विभागांमध्ये मेरी सहेलीहा उपक्रम सुरू केला आहे.  यामध्ये महिला प्रवाशांना सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

आरपीएफ म्हणजेच रेल्वे सुरक्षा दलाच्या पुढाकाराने महिला प्रवाशांबरोबर संवाद साधण्यात येत आहे. विशेषतः ज्यावेळी एकट्या महिला प्रवास करतात, अशा महिलांबरोबर बोलून प्रवासादरम्यान कोणती काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देण्यात येत आहे. त्यांना प्रवासामध्ये कोणतीही समस्या निर्माण झाली तर 182 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधण्याविषयी सांगण्यात आले. हे कार्य करताना रेल्वे सुरक्षा दलाच्या गटाकडून केवळ महिलांसाठी आरक्षित झालेले आसन क्रमांक एकत्रित करते. त्या महिला प्रवाशांना प्रवासामध्ये कोणकोणती स्थानके लागणार आहेत आणि गाडी कोठे थांबणार आहे, याची माहिती दिली जाते. तसेच एकट्या महिला प्रवाशांकडे रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी लक्षही ठेवतात.

गंतव्य स्थानकावर रेल्वे सुर्रक्षा दलाकडून संबंधित महिला प्रवाशांकडून अभिप्राय नोंदवून घेण्यात येत आहेत. या अभिप्रायाच्या विश्लेषणानंतर आवश्यकतेप्रमाणे सुरक्षा सेवेमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत. ‘‘मेरी सहेली’’ उपक्रमाअंतर्गत महिला प्रवाशांना रेल्वे प्रवासामध्ये काही त्रास झाला तर त्या समस्येचा निपटारा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत केला जात आहे.

‘‘मेरी सहेली’’ उपक्रम प्रारंभी दक्षिण पूर्व रेल्वे विभागात सप्टेंबर, 2020 मध्ये प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आला. या प्रयोगाला मिळालेल्या उत्साहवर्धक प्रतिसादामुळे आता रेल्वेच्या सर्व विभागामध्ये राबविण्याच्या दृष्टीने माहिती जमा करण्यात येत असून या उपक्रमाला गती देण्यात येणार आहे.

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668689) Visitor Counter : 261