संरक्षण मंत्रालय

पायाभूत सुविधा व्यवस्थापनासाठी भारतीय सैन्याकडून सॉफ्टवेअरचे उद्घाटन

Posted On: 29 OCT 2020 4:58PM by PIB Mumbai

 

स्वातंत्र्यपूर्व काळाच्या पुरातन वास्तूंच्या जागी मोठ्या कामांचे नियोजन करण्यात येत असलेल्या लष्कराच्या अनेक स्थानकांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला महत्त्व प्राप्त झाले आहे. ही प्रक्रिया काहीशी किचकट आणि वेळखाऊ आहे. सर्व छावणी आणि सैन्य केंद्रे आता मोठ्या लोकसंख्या असलेल्या ठिकाणांच्या जवळ आल्यामुळे जमीन देखील एक अत्यंत दुर्मिळ संसाधन बनली आहे. जमिनीची उपलब्धता, कामांचे नियोजन व देखरेख, पर्यावरण संवर्धन आणि प्रतिसादात्मक त्रैमासिक धोरणे यासारखी पायाभूत सुविधा व व्यवस्थापनाच्या दृष्टीने सध्याची सर्व कामे मानवांकडून पार पाडली जातात, ती केवळ वेळखाऊच नाही तर अकार्यक्षम देखील आहेत.

ऑटोमेशन हीच यावर गुरुकिल्ली आहे हे लक्षात घेऊन भारतीय लष्कराने इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सिस्टम (आयएमएस)नावाचे एक सॉफ्टवेअर तयार केले आहे. 28 ऑक्टोबर 2020 रोजी सैन्य कमांडर्स परिषदेदरम्यान सीओएएस यांच्या हस्ते या सॉफ्टवेअर चे उदघाटन करण्यात आले.

विकसित केलेल्या सॉफ्टवेअर पॅकेजमध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे

कामाची सुरुवात, यादी तयार करणे आणि मंत्रालयाकडून त्याला मंजुरी ही कामे स्वयंचलित पद्धतीने करणे.

प्रशासकीय मान्यता आणि सीएफएद्वारे अंमलबजावणीचे परीक्षण करणे.

सीएओ पूल व्यवस्था, सुट्टीची योजना, पुन्हा वाटप आणि देखभाल इत्यादी कामे स्वयंचलित पद्धतीने करणे

राहण्याच्या व्यवस्थेचे वाटप/मुलांचे शैक्षणिक मैदान, विशेष मुले आणि लढाई /शारीरिक दुर्घटना संदर्भात स्वयंचलित मान्यता.

आपत्कालीन बंदसह कॅन्टोन्मेंट रस्त्यांचे व्यवस्थापन

जमीन अतिक्रमण, जुने अनुदान बंगले, व्हीआयपी संदर्भ आणि जमीन हस्तांतरण / देवाणघेवाण यांचे परीक्षण करणे

*****

B.Gokhale/S.Tupe/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668449) Visitor Counter : 202