निती आयोग

नीती आयोग, रॉकफेलर फाऊंडेशन आणि स्मार्ट पॉवर इंडिया यांनी प्रकाशित केला विद्युत विस्तार आणि उपयोगिता बेंचमार्किंग अहवाल

Posted On: 28 OCT 2020 10:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2020

 

नीती आयोग, रॉकफेलर फाऊंडेशन आणि स्मार्ट पॉवर इंडिया यांनी आज विद्युत विस्तार आणि उपयोगिता बेंचमार्किंग अहवाल प्रकाशित केला. 

10 राज्यांमध्ये केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार- भारताच्या एकूण ग्रामीण लोकसंख्येपैकी 65% जनतेचे प्रतिनिधीत्व होईल आणि घरे, व्यावसायिक आस्थापना आणि संस्था यांच्या समावेशासह 25,000 हून अधिक नमुना आकारासह  25 वितरण सुविधांचे मूल्यांकन केले गेले आहे. 

मागणी (वीज ग्राहक) तसेच पुरवठा बाजू (वीज वितरण उपयुक्तता) या दोन्ही बाजूंकडून दृष्टिकोन  मिळविण्याच्या उद्देशाने अहवालात यासंदर्भात माहिती जाणूनघेण्याचा उद्देश आहे  :

  • या राज्यांमधील  वीज विस्ताराच्या   स्थितीचे मूल्यांकन करणे   आणि अर्थपूर्ण विस्तारात   असलेल्या सर्व आयामांसह वितरण सोयीसुविधांचे  मूल्यांकन करणे. 
  • विदुयत पुरवठ्यासाठी बेंचमार्क उपयोगिता क्षमता आणि शाश्वत पुरवठ्यासाठी चालक  ओळखणे.  
  • शाश्वत  वीज विस्तार  वाढविण्यासाठी शिफारसी विकसित करणे 

अहवालातील महत्त्वाच्या बाबी - 

  • जवळपास 92% ग्राहकांनी त्यांच्या आसपासच्या 50 मीटरच्या आत विद्युत पायाभूत सुविधांची एकूण उपलब्धता नोंदविली; तथापि, सर्वांसाठी जोडणी नाही  याचे मुख्य कारण म्हणजे जवळच्या खांबापासून घरांचे अंतर हे आहे.
  • एकंदरीत, सर्वेक्षण केलेल्या 87% ग्राहकांना ग्रीड-आधारित विजेची सोय  आहे. उर्वरित 13% एकतर ग्रीड नसलेले स्रोत  वापरतात किंवा कोणतीही वीज वापरत नाहीत.
  • ग्राहक श्रेणींमध्ये दररोज सुमारे 17 तास यानुसार पुरवठ्याच्या तासात लक्षणीय प्रमाणात सुधारणा झाली  आहे.
  • जवळपास 85% ग्राहकांनी मीटरने वीज जोडणी केल्याची नोंद केली.
  • 83% घरगुती ग्राहकांपर्यंत विजेचा पुरवठा झालेला आहे .

उपयोगिता  सेवेसह ग्राहकांच्या एकूण समाधानाच्या पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी एक समाधान निर्देशांक  तयार केला गेला आहे . अभ्यासानुसार असे सर्वेक्षण करण्यात आले आहे की सर्वेक्षण केलेल्यांपैकी  एकूण 66% लोक समाधानी आहेत - शहरी भागातील 74% ग्राहक आणि ग्रामीण भागातील 60%.

अनावरणादरम्यान  नीती  आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले की, 'या अहवालात सरकारप्रणीत योजनांचा जसे की प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना आणि दीनदयाळ  उपाध्याय ग्राम ज्योती योजना  शहरी आणि ग्रामीण भागात पोहोचल्या आहेत.'' त्यांनी रॉकफेलर फाउंडेशनला ऊर्जा मंत्रालयासोबत  भागीदारीत अहवालातील ठळक मुद्दे सोडविण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आणि  पंजाबमधील डीबीटी योजनांपासून शिकणे, दर सुलभ करणे आणि तर्कसंगत करणे; आणि उच्च कार्यप्रदर्शन असलेल्या भारतीय वितरणातील सर्वोत्तम पद्धती या  तीन महत्त्वाच्या बाबींवर त्यांनी  प्रकाश टाकला

 
 

* * *

S.Thakur/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1668278) Visitor Counter : 203