ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
खरीप विपणन हंगाम 2020-21 मध्ये किमान हमीभावानुसार खरेदी व्यवहार सुरु
Posted On:
28 OCT 2020 8:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2020
केंद्र सरकार, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाच्या खरीप हंगामात (2020-21) देखील किमान हमीभावानुसार खरेदी करत आहे.
वर्ष 2020-21 च्या खरीप हंगामानुसार पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, चंदीगढ, जम्मू काश्मीर, केरळ आणि गुजरात या राज्ये/ केंद्रशासित प्रदेशात किमान हमीभावानुसार 27 ऑक्टोबरपर्यंत 170.53 लाख मेट्रिक टन धानाची खरेदी करण्यात आली. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात 26.46 % वाढ झाली आहे.
सुमारे 14.37 लाख शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीनुसार खरेदीचा लाभ झाला आहे, आतापर्यंतची एमएसपी खरेदी 32195.69 कोटी रुपये एवढी झाली आहे.
याव्यतिरिक्त राज्यांकडून आलेल्या प्रस्तावांनुसार तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, ओदिशा, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांना समर्थन मुल्यानुसार 45.10 लाख मेट्रीक टन डाळी आणि तेलबिया खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच 1.23 लाख मेट्रीक टन खोबऱ्याच्या खरेदीसाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळला परवानगी देण्यात आली आहे. इतर राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना पीएसएस अंतर्गत डाळी, तेलबिया आणि खोबरे खरेदीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यावर बाजारभाव एमएसपीपेक्षा कमी आला तर मान्यता देण्यात येईल, जेणेकरून या पिकांच्या एफएक्यू ग्रेडची खरेदी थेट शेतकरी, केंद्रीय नोडल एजन्सीजकडून राज्य निर्देशित खरेदी संस्थामार्फत करता येईल.
27 ऑक्टोबरपर्यंत सरकारने नोडल संस्थांच्या मार्फत 2306.41 मेट्रीक टन मुग, उडीद आणि भुईमूगाच्या शेंगा खरेदीला परवानगी दिली आहे. 14.13 कोटी रुपये एमएसपी मुल्याच्या या खरेदीचा तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि हरियाणातील 1697 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. तसेच 5089 मेट्रीक टन खोबऱ्याची 52.40 कोटी एमएसपी मुल्याने खरेदी केली आहे, याचा कर्नाटक आणि तामिळनाडूमधील 3961 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
एमएसपीनुसार कापूस खरेदी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्य प्रदेश राज्यांमध्ये सुरळीत सुरु आहे. 27.10.2020 पर्यंत 442266 गासड्या कापूस, ज्याचे मुल्य 129951 लाख रुपये आहे एवढी खरेदी झाली असून याचा 84138 शेतकऱ्यांना लाभ झाला आहे.
* * *
B.Gokhale/S.Thakur/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1668234)
Visitor Counter : 159