संरक्षण मंत्रालय

नौदल प्रमुखांनी समुद्रातील परिचालन सज्जतेचा घेतला आढावा

Posted On: 22 OCT 2020 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 ऑक्‍टोबर 2020

 

नौदल प्रमुख ऍडमिरल करमबीर सिंह यांनी 22 ऑक्टोबर 2020 रोजी भारतीय नौदलाच्या प्रमुख लढाऊ सैनिकांची परिचालन सज्जता आणि लढाई-तयारीचा  आढावा घेतला.

फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ वेस्टर्न नेव्हल कमांड, व्हाईस ऍडमिरल  अजित कुमार यांच्यासमवेत नौदल प्रमुख  कारवार नौदल तळावर पोहचले आणि त्यांनी तेथील कर्मचार्‍यांशी संवाद साधला आणि युद्ध-क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी दुरुस्ती, देखभाल, सुटे भाग  या प्रमुख मुद्द्यांवर भर दिला. त्यांनी सायबर-सुरक्षा, दहशतवादी हल्ल्यांविरूद्ध दलाचे संरक्षण, या बाबींचा पुनरुच्चार केला आणि सर्व कर्मचार्‍यांना उच्चस्तरीय सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.

त्यानंतर अ‍ॅडमिरल करमबीर सिंह हेलिकॉप्टरने कॅरियर बॅटल ग्रुपकडे रवाना  झाले. यात विक्रमादित्य, विनाशिका , फ्रिगेट्स, कार्वेट्स, फ्लीट सपोर्ट शिप्स आणि लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश होता. स्वदेशी मार्गदर्शित-क्षेपणास्त्र नाशक चेन्नईमध्ये चढण्यापूर्वी त्यांना फ्लीट कमांडरने परिचालन तत्परतेची माहिती दिली. त्यानंतर शस्त्रास्त्र गोळीबार, एअर-टू-एअर लढाई मोहीम , पाणबुडीविरोधी कवायती यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यानंतर नौदल प्रमुख जहाजातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी फ्लीट सपोर्ट नौका दीपकवर चढले. त्यानंतर विमानवाहू जहाज विक्रमादित्यमध्ये प्रवेश केला आणि तेथे हवाई संरक्षण आणि हल्ल्यासाठी कॅरियर बॅटल ग्रुपची क्षमता पाहिली.

विक्रमादित्यच्या ब्रॉडकास्ट वरून कॅरियर बॅटल ग्रुपच्या लढाऊ सैनिकांना संबोधित करताना, नौदल प्रमुखांनी  कोविड -काळातही  गेल्या काही महिन्यांत निरंतर -लढाई-तयारी आणि परिचालनाचा स्तर  कायम ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. मान्सूनच्या काळात सागरी सुरक्षिततेसाठी भारतीय नौदल मिशन-तैनात आणि लढाईसाठी सज्ज आहे. ‘मिशन सागर’ चा भाग म्हणून ‘आयओआर देशांमधून पीडित नागरिकांना परत पाठविण्याबद्दल आणि‘ आयओआर’मधील  मैत्रीपूर्ण शेजार्‍यांना वैद्यकीय व लॉजिस्टिक मदत देण्याबाबत ‘ओपी समुद्र सेतू’ मधील नौदलाच्या योगदानाबद्दल त्यांनी देशाला अभिमान असल्याचे अधोरेखित केले.

सध्याच्या सुरक्षा परिस्थितीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, नौदल येत्या काही महिन्यांत मोठ्या मोहिमा कायम ठेवेल. अचूक आणि प्रभावी शस्त्रास्त्र गोळीबारात कॅरियर बॅटल ग्रुप आणि त्यातील लढाऊ सैनिकांचे त्यांनी कौतुकही केले ज्यामुळे  कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी नौदल सज्ज आहे यात कोणतीही शंका नाही. 

नौदल प्रमुखांनी कोविड  साथीसंबंधी प्रोटोकॉलचे पालन सुरू ठेवण्याचा सल्ला नौदल कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना  दिला.

समुद्रातील तयारीची पाहणी  झाल्यानंतर नौदल प्रमुख गोव्याला परतले आणि नेव्हल एअरक्राफ्ट यार्डला भेट दिली. त्यानंतर ते नवी दिल्लीला रवाना झाले

 

* * *

B.Gokhale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1666899) Visitor Counter : 20


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu