कोळसा मंत्रालय
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात 5 नोव्हेंबर 2020 रोजी कोळशाबाबतच्या पाचव्या संयुक्त कृती गटाची बैठक
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2020 8:24PM by PIB Mumbai
भारत आणि इंडोनेशिया यांच्यातल्या कोळसाविषयक संयुक्त कृती गटाची बैठक, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग च्या माध्यमातून येत्या पाच नोव्हेंबर 2020 रोजी होणार असून भारताकडे या बैठकीचे यजमानपद आहे.
भारतातर्फे कोळसा विभागाचे अतिरिक्त सचिव, विनोद कुमार तिवारी,आणि इंडोनेशियाच्या खनिज आणि कोळसा मंत्रालयाचे महासंचालक डॉ इर. रीधवान जमालुद्दिन संयुक्तपणे या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.
या एक दिवसीय बैठकीत भारतीय कोळसा धोरण सुधारणांविषयी चर्चा होणार आहे. सद्यस्थिती, भारतात स्वयंपाकाच्या गैसचे उत्खनन आणि व्यावसायिक कोळसा खाणकाम,सीसीटीचे भारतात संशोधन आणि विकास तसेच इंडोनेशिया-भारत यांच्यात कोविड नंतरच्या कोळसाविषयक भागीदारी आणि सहकार्याबाबत चर्चा देखील होणार आहे.
या बैठकीतील व्यापारविषयक सत्रात, दोन्ही देशातील उद्योगक्षेत्र, नियामक आराखड्याच्या पार्श्वभूमीवर, त्याचा उद्योगांवर होणारा परिणाम, याविषयी चर्चा करणार आहे. यातून कोळसा क्षेत्रात व्यवसायाच्या आणखी संधी आणि क्षेत्रे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. या चर्चेतून, दोन्ही देशातील कोळसा उद्योगाला मार्गदर्शन मिळण्यास मदत होईल.
****
B.Gokhale/ R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1666212)
आगंतुक पटल : 140