गृह मंत्रालय
शेतकर्यांना 8 पिकांच्या 17 नवीन बियाण्यांचे विविध प्रकार समर्पित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचे आभार मानले
मोदी सरकार कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्याबरोबरच देशाला पोषक सुरक्षा देण्यासाठी वचनबद्ध आहे
योग्य पोषण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि मोदी सरकार त्यासाठी दिवस रात्र काम करत आहे
पंतप्रधान मोदींचे हे दूरदर्शी निर्णय केवळ गरीबातील गरीब व्यक्तींनाच योग्य पोषण देणार नाहीत, तर आपल्या शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल
ही पिके लोकांना पोषण देतील आणि राष्ट्र ‘हरित क्रांती’ कडून ‘सदाहरित क्रांती’ कडे जाईल; या पिकामध्ये तीनपट अधिक पोषण मूल्य असेल जे सामान्य थाळीला पौष्टिकदृष्ट्या समृद्ध बनवेल
Posted On:
16 OCT 2020 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2020
शेतकर्यांना विविध पिकांच्या नवीन बियाण्यांचे विविध प्रकार समर्पित केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचे आभार मानले आहेत. ट्वीटच्या माध्यमातून अमित शहा म्हणाले, “कृषी क्षेत्रासाठी आज एक ऐतिहासिक दिवस आहे कारण नरेंद्र मोदी आणि नरेंद्र तोमर यांनी 8 पिकांच्या 17 नवीन बियाण्यांचे विविध प्रकार शेतकऱ्यांना समर्पित केले. ही पिके लोकांना पोषण देतील आणि राष्ट्र ‘हरित क्रांती’ कडून ‘सदाहरित क्रांती’ कडे जाईल. ”
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “मोदी सरकार देशाला पोषक सुरक्षा देण्याबरोबरच कृषी क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. या नवीन पिकांचे पौष्टिक मूल्य तीन पटीने अधिक असेल, जे प्रथिने, कॅल्शियम आणि लोह यासारख्या आवश्यक पौष्टिक घटकांसह साधारण थाळीला पौष्टिक बनवतील. ”
अमित शहा पुढे म्हणाले की, “योग्य पोषण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि मोदी सरकार त्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या दूरदर्शी निर्णयांमुळे गरीबातील गरीबांना योग्य पोषण तर मिळेलच, शिवाय आपल्या शेतकर्यांचे उत्पन्नही वाढेल.
* * *
B.Gokhale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1665236)
Visitor Counter : 149