रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

गडकरी यांच्या हस्ते उद्या आंध्रप्रदेशातील 16 राष्ट्रीय महामार्गांच्या प्रकल्पांचा प्रारंभ आणि पायाभरणी समारंभ


1400 किमी लांबीच्या 15,592 कोटी रुपयांच्या या महामार्गांमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मिळणार चालना

Posted On: 15 OCT 2020 7:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020

केंद्रीय रस्ते वाहतूक ,महामार्ग आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी उद्या आंध्रप्रदेशातील 1411 किलोमीटर लांबीच्या आणि 15,592 कोटी रुपयांच्या 16 राष्ट्रीय महामार्गांच्या  प्रकल्पांच्या कामांचा  प्रारंभ तसेच पायाभरणी  करणार आहेत.या समारंभाचे अध्यक्ष मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी असून केंद्रीय सामाजिक सुरक्षितता मंत्रालयाचे(MoSs) जनरल (निवृत्त )डॉ. व्हि.के.सिंग आणि श्री. जी.किशन रेड्डी,राज्याचे इतर मंत्री, संसदेतील सदस्य ,विधानसभा सदस्य आणि केंद्रातील आणि राज्यातील वरीष्ठ अधिकारी या समारंभाला उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात 188.75किमी लांबीचा, 2075 कोटी रुपयांचा,  राष्ट्रीय महामार्ग-40चा , चौपदरी कडापा-मायडुकूर-कुर्नुल महामार्ग हा  भाग, 64.611किमी लांबीचा, 1470कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्ग -65 चा बेंझ सर्कल फ्लाय ओव्हर सह 4 पदरी विजयवाडा -मछलीपटनम हा मार्ग, 47.687किमी लांबीचा 1100कोटी रुपयांचा चौपदरी नलगमपल्ली ते आंध्रप्रदेश, कर्नाटक सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग -4, 47किमी लांबीचा भाग 1470 कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्ग -16चा सहा पदरी  रणस्थलम ते  आनंदपूरम या मार्गांचा   प्रारंभ  आणि  भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार केलेला 30 किमी लांबीचा 1225 कोटी रुपयांच्या विजयवाडा बायपासच्या सहा पदरी चिन्नाअवटूपल्ली ते गोल्लापडी मार्गाचा  ,17.88 किमी लांबीच्या 1600 कोटी रुपयांच्या गोलापुड्डी ते चिन्नाकाकानी  या कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग -16च्या विजयवाडा, 57.05 किमी लांबी ,2225कोटी रुपयांचा राष्ट्रीय महामार्ग -71चा  सहापदरी रेनीगुंटा ते नायडूपेटा मार्ग,5.92किमी लांबीचा 70.81कोटी रूपयांच्या राष्ट्रीय महामार्ग-26चा रायपूर ते विशाखापट्टणम भागाचा   पायाभरणी समारंभ  अशा एकूण  16 राष्ट्रीय महामार्गांच्या प्रारंभाचा आणि पायाभरणी समारंभाच्या कार्यक्रमांचा समावेश आहे.

 

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664869)