संरक्षण मंत्रालय
78 वा ईएमई कॉर्प्स दिन साजरा
Posted On:
15 OCT 2020 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स कॉर्प्स 15 ऑक्टोबर 2020 रोजी 78 वा कॉर्प्स दिन साजरा करत आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकेनिकल इंजिनिअर्सचे कॉर्प्स भारतीय सैन्याच्या उपकरणे आणि शस्त्र प्रणालींच्या संपूर्ण श्रेणीला एकात्मिक अभियांत्रिकी सहाय्य पुरवतात. तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधनाच्या सामर्थ्याचा वापर करून सैन्याची लढाऊ क्षमता वाढवतात. ईएमईच्या पथकाने विविध क्षेत्रात नवीन शिखरे गाठली आहेत आणि लढण्याची कार्यक्षमता वाढवण्यात ते महत्वपूर्ण असल्याचे सिद्ध झाले आहे. कॉविड -19 महामारीच्या काळात त्यांनी आपले कौशल्य सिद्ध केले असून व्हेंटिलेटरसह महत्वपूर्ण वैद्यकीय उपकरणे सज्ज ठेवली आहेत. कोविड -19 विरुद्ध लढ्यात राष्ट्रीय प्रयत्नांमध्ये योगदान देणारी असंख्य संशोधने विकसित करण्यात आली आहेत.
या पथकांनी (कॉर्प्स) भारतीय सैन्यात साहसी खेळांच्या क्षेत्रात नेहमीच आघाडी घेतली आहे. गिर्यारोहण , स्काय डायव्हिंग, सेलिंग, हॉट वॉटर बलूनिंग, पॅरा सेलिंग, हँग ग्लायडिंग, स्कीइंग, राफ्टिंग, कॅनोइंग आणि अंटार्क्टिका मोहिमेत मोठी चालना दिली आहे. फ्लाईंग शीख म्हणून ओळखल्या जाणार्या पद्मश्री पुरस्कार प्राप्त मिल्खा सिंग यांनी तीन उन्हाळी ऑलिंपिक आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. कर्नल जेके बजाज, व्हीएसएम, एसएम यांनी गिर्यारोहण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. नुकतीच लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी ‘व्हर्च्युअल रेस अक्रॉस अमेरिका’ जेतेपद पटकावले. तर मॅरेथॉन धावपटू लेफ्टनंट कर्नल विशाल अहलावत यांनी असंख्य अर्ध मॅरेथॉनमध्ये विक्रम नोंदवून गौरव वाढवला आहे.
भारतीय सैन्याची कार्यवाही सज्जता उच्च पातळीवर कायम राहावी यासाठी ईएमईच्या कॉर्प्सनी नेहमीच योगदान दिले. त्यांचा वारसा कायम ठेवून देशाचा गौरव वाढवण्याची प्रतिज्ञा त्यांनी घेतली.

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664845)
Visitor Counter : 97