भूविज्ञान मंत्रालय
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या दक्षिण कोकण प्रदेशात अद्यापही कमी दाबाचे क्षेत्र कायम
पुढील 48 तासात महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्टयाची तीव्रता वाढेल
हा पट्टा पश्चिम- वायव्येकडे सरकत जाऊन तीव्र स्वरूपाचा होईल
दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टीची (20 सेंमी प्रतिदिन) शक्यता
समुद्राची स्थिती खवळलेली राहिल ; मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा
Posted On:
15 OCT 2020 3:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020
भारतीय हवामान विभागाच्या वादळ पूर्वानुमान विभागानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज 15 ऑक्टोबर 2020 रोजीही साडेआठ तास कायम राहणार आहे.
हा पट्टा पश्चिम- वायव्य भागात सरकेल आणि अरेबियन समुद्राच्या पूर्व मध्य तसेच महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात आणि अरबी समुद्राजवळ उत्तर-पूर्व भागात आणि महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनाऱ्यावर पुढील 48 तासात तीव्र स्वरुपाचा होईल. तो पुढे पश्चिम- वायव्येच्या दिशेने सरकून अधित तीव्र स्वरुपाचा होईल.
सूचना
- पावसाचा इशारा
15 ऑक्टोबर 2020: बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, कोकण गोव्यात आणि घाट प्रदेशात तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस. दक्षिण कोकण आणि त्या जवळचा घाट प्रदेशात अति मुसळधार पाऊस ( दिवसाला 20 सेंटिमीटर ) पडेल
16 ऑक्टोबर 2020 : हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुसंख्य ठिकाणी कोकण गोव्यात काही ठिकाणी जोरदार अती जोरदार दक्षिण गुजरातचा किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाची शक्यता.
- जोरदार वाऱ्याचा इशारा
मध्य महाराष्ट्रात येत्या बारा तासात ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. हा वेग ताशी 40 किलोमीटरपर्यंतही पोहोचेल. त्यानंतर तीव्रता कमी होईल. अरबी समुद्राच्या मध्यपूर्व भागात तसेच उत्तर-पूर्व भागात ताशी 25 ते 35 ते ताशी 45 किमी वेगाने वारे वाहतील.
गोवा महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीच्या प्रदेशात पुढील 12 तास ही स्थिती कायम असेल.
वादळी वाऱ्यांचा वेग वाढत जाऊन अरबी समुद्राच्या मध्य पूर्व भागात तसेच ईशान्येकडे याचा जोर वाढत जाऊन महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीला 16 ऑक्टोबर संध्याकाळपासून जोरदार वारे वाहतील. याच भागात वाऱ्याचा वेग 17 ऑक्टोबरला वाढून ताशी 50 ते 65 ते 75 पर्यंत जाऊ शकेल.
- समुद्राची स्थिती
अरबी समुद्राच्या पूर्व मध्यभाग आणि ईशान्य भागात समुद्र खवळलेला ते अती खवळलेला राहील. ही स्थिती महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर आज संध्याकाळपासून 18ऑक्टोबर पर्यंत कायम राहील.
- मच्छिमारांना इशारा
आजपासून तीन दिवस महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर तसेच अरबी समुद्राच्या पूर्व मध्य आणि ईशान्य भागात जाऊ नये असा इशारा मच्छिमारांना देण्यात येत आहे.
कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट विभागात होणाऱ्या हानीचे पूर्वानुमान
पावसाच्या माऱ्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भात, केळी, पपई आणि इतर फळबागा, शेवगा आणि भाज्यांचे नुकसान होईल. मुसळधार पावसामुळे कच्च्या बंधाऱ्यांचे नुकसान होईल.
सखल भागांमध्ये पूर, पाणी साचणे, वाहतुकीत अडथळा, भूस्खलन होईल आणि पाणी साचेल. तसेच रस्ते ओले आणि निसरडे होतील.
अतिवृष्टीमुळे नाल्यांमध्ये अडथळे येऊन अचानक पूरस्थिती निर्माण होईल.
अधिक माहितीसाठी कृपया www.rsmcnewdelhi.imd.gov.in www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
हवामान अंदाज आणि विविध इशाऱ्यांच्या माहितीसाठी मौसम ॲप आणि शेतीशी संबधीत हवामान ईशाऱ्यांसाठी मेघदूत ॲप डाऊनलोड करा. वीजेच्या इशाऱ्यांसाठी दामिनी ॲप डाऊनलोड करा.
B.Gokhale/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1664758)
Visitor Counter : 127