पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर साधला संवाद

Posted On: 14 OCT 2020 9:24PM by PIB Mumbai

 

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशामध्ये होत असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगमोहन रेड्डी यांच्याशी संवाद साधला. पंतप्रधानांनी  दोन्ही राज्यातल्या पूरस्थितीची माहिती घेतली. 

‘‘तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर गारू आणि आंध्र प्रदेश मुख्यमंत्री वाय एस जगन गारू यांच्याशी बोलून अतिवृष्टीमुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी माहिती घेतली. तसेच पूरग्रस्तांच्या बचाव आणि मदत कार्यासाठी केंद्राच्यावतीने सर्वतोपरी मदत देण्यात येईल, अशी ग्वाही उभय मुख्यमंत्र्यांना दिली. अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांविषयी माझ्या मनात सहानुभूती आहे.’’ असे पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटर संदेशात म्हटले आहे.

Spoke to @TelanganaCMO KCR Garu and AP CM @ysjagan Garu regarding the situation in Telangana and AP respectively due to heavy rainfall. Assured all possible support and assistance from the Centre in rescue & relief work. My thoughts are with those affected due to the heavy rains.

— Narendra Modi (@narendramodi) October 14, 2020

***

S.Thakur/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1664562) Visitor Counter : 220