कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

नव्या कृषी सुधारणांमुळे देशातील युवकांसाठी कृषी उद्यमशीलतेत सुलभता येईल- केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

Posted On: 14 OCT 2020 9:08PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या कृषी कायद्यामुळे देशातील युवकांसाठी कृषी उद्यमशीलतेत सुलभता येईक आणि त्यांना कृषीउद्योगाची व्यवसाय म्हणून निवड करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

जम्मू कश्मीरमधल्या उधमपूर-कथुआ-डोडा या त्यांच्या लोकसभा मतदार संघात आयोजित युवा संमेलनातत्यांनी आज युवा शेतकऱ्यांशी  संवाद साधला. या सुधारणांचे अनेक व्यापक लाभ असून ते पुढे काळाच्या ओघात हळूहळू लक्षात येतील आणि कृषीव्यवसायाची पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील युवकही हळूहळू या क्षेत्राकडे वळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संसदेत अलीकडेच संमत झालेल्या या कायद्यातून दिल्या जाणाऱ्या पर्याय आणि सुविधांचा उद्देश देशातील युवा शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आणि पद्धतींच्या माध्यमातून सक्षम करणे हा आहे.

आधीच्या व्यवस्थेत शेतकऱ्यांना  आपली पिके केवळ कृषी उत्पन्न बाजार समितीतच विकण्याचे बंधन होते, हे पन्नास वर्ष जुनी व्यवस्था आहे, मात्र आता त्यात कालानुरूप बदल करायला हवे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले. आज मात्र सगळी परिस्थिती बदलली आहे. आजच्या युवा शेतकऱ्यांकडे अधिक संसाधने आहेत, त्यांचा संपर्क दांडगा आहे, त्याला सगळ्या जगाची माहिती आहे, आणि म्हणूनच आपण अशा शेतकऱ्यांना त्यांच्या मालाच्या विक्रीसाठी उपलब्ध पर्यायांपासून वंचित ठेवू शकत नाही, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

सर्व युवा शेतकरी आणि ग्रामपंचायत प्रतिनिधी या वेबिनारमध्ये सहभागी झाले होते, त्यांनीही या सर्व कृषी कायद्यांचे स्वागत केले आणि हे कायदे कृषी क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणारे आहेत, असे मत व्यक्त केले.

यावेळी गौरव शर्मा, जसविंदर सिंग जस्सी, राहुल हंस, शशांक गुप्ता अशा युवा शेतकऱ्यांनी या वेबिनारमध्ये आपली मते मांडली.

<><><><><>

B.Gokhale/R.Aghor/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1664556) Visitor Counter : 137